कुर्ला रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली आहे. धावत्या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेने दुसऱ्या महिलेवर विनयभंगाचा आरोप केला आहे. शुक्रवारी ट्रेनने प्रवास करताना ही घटना घडली आहे.
शुक्रवारी धावत्या ट्रेनमध्ये एक महिला आणि महिला फेरीवाल्यांमध्ये भांडणे झाली. यात त्या दोघींची हाणामारीदेखील झाली. ट्रेनमधील प्रवाशांनी त्यांची भांडणे थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. (Latest News)
धावत्या ट्रेनमध्ये या दोघींमधील भांडणे वाढली. यात एका महिलेच्या कुर्त्याची बटणे तोडली. त्यामुळे वाद आणखीच चिघळला. त्यानंतर हे प्रकरण कुर्ला जीआरपीपर्यंत गेले. याप्रकरणी महिलेने कुर्ला जीआरपीमध्ये तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणी महिला फेरीवाल्याला नोटीस बजावली आहे. अजून फेरीवाल्या महिलेला अटक करण्यात आली नाही. तर उलट फेरीवाल्या महिलेनेच प्रवासी महिलेविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली आहे.
इंजिनीअरने एक्स्प्रेसच्या एसी कोचमधील टॉयलेटमध्ये महिलेवर केला बलात्कार
लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये मॅकनिकल इंजिनीअर म्हणून कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याने महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी महिलेने आरोपीवर बलात्कार, विनयभंग आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. यासंबंधीचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं प्रसिद्ध केलं आहे.
पीडित महिला कंत्राटी कर्मचारी म्हणून एलटीटीजवळ यार्डमध्ये असणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांची साफसफाई करायची. २०२२ मध्ये काशी एक्स्प्रेसमध्ये सफाई करत असताना आरोपीशी ओळख झाली होती. त्यावेळी तो यार्डमध्ये तपासणी करण्यास आला होता.
आरोपीने महिलेच्या वाढदिवशी पाटलीपुत्र एक्स्प्रेसमध्ये तिच्या संमतीशिवाय किस केले होते. त्यानंतर एक्स्प्रेसमध्ये एसी कोचच्या टॉयलेटमध्ये बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.