LTT fire News : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवर आग, धुराचे लोट; VIDEO

LTT Fire News : मुंबईमधील कुर्ल्याजवळील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे आग लागली. धुराचे लोट बाहेर पडत होते. टर्मिनसवरील कँटीनमध्ये ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
LTT Fire News
LTT Fire NewsSAAM TV
Published On

LTT fire at kurla in Mumbai :

मुंबईमधील कुर्ल्याजवळील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे आग लागली. धुराचे लोट बाहेर पडत होते. टर्मिनसवरील कँटीनमध्ये ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबईतील (Mumbai Fire News) लोकमान्य टिळक टर्मिनसवरील कँटीनमध्ये (LTT Railway Station Canteen ) बुधवारी दुपारी भीषण आग लागली. आग इतकी पसरली की आगीचे लोळ आणि धुराचे लोट मोठ्या प्रमाणात बाहेर पडत होते. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे कर्मचारी बंब घेऊन घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आग आटोक्यात आणण्यास सुरुवात केली.

पीटीआयच्या वृत्तानुसार, एलटीटीवरील (LTT Fire News) फलाट क्रमांक १ वर जन आहार कँटिनमध्ये (Jan Aahar Canteen) ही आग लागली. दुपारी साधारण पावणेतीनच्या सुमारास ही घटना घडली. रेल्वे अधिकाऱ्यांच्या (Railway Officer ) माहितीनुसार, या घटनेत आतापर्यंत कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. काही वेळातच या आगीच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

LTT Fire News
Pune Crime News: लय माज आला आहे का?, ८ दिवसांत डेमो देतो; शिंदे गटाच्या पुण्यातल्या नेत्याला धमकी

स्टेशनच्या इमारतीतून वरच्या बाजूला आगीचे लोळ आणि धूर मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असताना या व्हिडिओत दिसत होते.

मध्य रेल्वेचे (Central Railway) मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी पीटीआयला यासंदर्भात माहिती दिली. रेल्वे स्थानकावरील जन आहार कँटीनमध्ये ही आग लागली, असे त्यांनी सांगितले.

रेल्वे गाड्या सुरू आहेत. फलाट क्रमांक १ बंद आहे. काही वेळानं ते सुरू होईल. हॉटेलचं काम सुरू होतं, तिथं आग लागली असावी. या घटनेची चौकशी केली जाईल. त्यानंतर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे (Central Railway Service) विभागीय संचालक रजनीश गोयल यांनी दिली.

LTT Fire News
Nashik Crime: दारूचे पैसे मागितल्याच्या रागातून कामगाराला मारहाण; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com