Nagpur Crime News:वाळू तस्करांची हिम्मत वाढली, कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न, तिघांना अटक

sand smuggling Nagpur : वाळू तस्करी रोखण्यासाठी शासनाने कठोर उपाययोजना केल्या आहेत. रामटेक तालुक्यात वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
Nagpur Crime News:वाळू तस्करांची हिम्मत वाढली, कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न, तिघांना अटक
Published On

Nagpur Crime Sand Smuggling

नागपूरमध्ये (Nagpur) बेकायदेशीर रेती धंदा फोफावला आहे. तेथे वाळू तस्करांची हिंमत देखील वाढली असल्याचं पाहायला मिळतंय. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात (Ramtek Revenue Department) वाळू माफियांवर कारवाईसाठी गेलेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. वाळू तस्करांनी रामटेक महसूल विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना रेती वाहतुकीवरील कारवाई दरम्यान जीवे मारण्याचा प्रयत्न (Nagpur Crime) केलाय. (latest marathi news)

अधिकाऱ्यांच्या पथकावर हल्ला

घोटीटेक शिवारात ही घटना (Sand Smuggling) घडली होती. तेथे ओव्हल्लोड ट्रकची वाहतूक होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. तेव्हा त्यांच्या पथकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या वाळू माफियांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. वंदना सवरंगपते असं उपविभागीय अधिकारी यांचं नाव आहे. त्यांच्याच पथकावर हल्ला (Ramtek Revenue Department) झाल्याची घटना घडली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शासकीय कामात अडथळा

अधिकाऱ्यांनी या वाळू माफियांचं (Sand Smuggling) वाहन थांबवण्यात प्रयत्न केला. तेव्हा ट्रक चालकांनी पळ काढला. तसंच त्यांनी अधिकाऱ्यांच्या पथकाच्या वाहनासमोर वाहनं देखील लावली होती. त्यांनी शासकीय कामात अडथळा (Nagpur Crime) आणलाय. हा सगळा प्रकार सउपविभागीय अधिकारी यांच्या वाहन चालकाच्या कॅमेरात कैद झालाय.

याप्रकरणी रामटेक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. महसूल विभागांने आतापर्यंत ६ ते ७ वाळू ट्रक जप्त केले आहेत. या हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आलीय. त्यांच्याकडून नॅनो आणि ट्रक जप्त करण्यात (Nagpur) आलीय.

Nagpur Crime News:वाळू तस्करांची हिम्मत वाढली, कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न, तिघांना अटक
Pune Crime News: बहिणीची छेड काढली म्हणून भाऊ खवळला,केली एका सराईत गुन्हेगाराची हत्या

तिघांना अटक

जोगेश्वर हरिदास यादव 35 वर्ष रा. पारडी नागपूर व यातील नॅनो कार चालक, मोनू कादर खान वय 34 वर्ष रा. खरबी नागपूर आणि विष्णू चंद्रप्रकाश मिश्रा वय 33 वर्ष रा. खरबी नागपूर यांना अटक करण्यात आलं आहे. या गुन्ह्यामध्ये वापरली गेलेली ट्रक आणि नॅनो कार नागपूर ग्रामीण पोलिसांनी रात्री जप्त केली आहे.

वाळू तस्करी (Sand Smuggling) रोखण्यासाठी शासनानं प्रत्येक जिल्ह्यात वाळू डेपो सुरू केले आहेत. माफक दरात वाळू उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलाय. वाळूची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी देखील शासनाने कारवाई सुरू केली. त्यामुळं वाळू तस्करी करणाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे ते कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना आता भीती दाखवण्याचे प्रयत्न करत (Nagpur) आहेत.

Nagpur Crime News:वाळू तस्करांची हिम्मत वाढली, कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न, तिघांना अटक
Hingoli Crime : धक्कादायक! अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या आई- वडील, भावाला संपवले; खुनानंतर अपघाताचा केला बनाव

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com