Dombivli Crime News: आईला वेश्याव्यवसायातून वाचवण्यासाठी मुलीचे भयंकर कृत्य; चार वर्षीय मुलाचे अपहरण

Crime News: डोंबिवलीत एक धक्कादायक घटना घडली आहे. डोंबिवलीत काही दिवसांपूर्वी चार वर्षाच्या मुलाचे अपहरण झाले होते. याप्रकरणी एक धक्कादायक माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. एका १७ वर्षीय मुलीने ४ वर्षाच्या मुलाचे अपहरण केले होते.
Crime News
Crime NewsSaam tv

डोंबिवलीत एक धक्कादायक घटना घडली आहे. डोंबिवलीत काही दिवसांपूर्वी चार वर्षाच्या मुलाचे अपहरण झाले होते. याप्रकरणी एक धक्कादायक माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. एका १७ वर्षीय मुलीने ४ वर्षाच्या मुलाचे अपहरण केले होते. आरोपी मुलीने आपल्या आईला आणि काकीला वाचवण्यासाठी हे टोकाचे पाऊल उचलले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी बांग्लादेश येथील आहे. ज्या व्यक्तीने तिला, तिच्या आईला आणि काकूला वेश्याव्यवसायात काम करण्यासाठी भाग पाडले होते. त्याच व्यक्तीच्या मुलाचे तिने अपहरण केले. कपड्याच्या कारखान्यात नोकरी देतो, असे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला, तिच्या आईला आणि काकीला डोंबिवलीत आणले. डोंबिवलीत आल्यानंतर त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री डोंबिवली पूर्वी येथील एका व्यक्तीने मानपाडा पोलिस ठाण्यात आपल्या ४ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याचे तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान, आरोपी भिवंडी बसस्थानकाच्या दिशेने मुलाला घेऊन जात असल्याचे पोलिसांना समजले. त्यांनी ही माहिती भिवंडी गुन्हे शाखेला दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला बाळासह ताब्यात घेतले.

Crime News
Pune News: उन्हामुळे पिक जळालं; कर्जबाजारीपणाला कंटाळून 45 वर्षीय शेतकर्‍याची आत्महत्या, परिसरात हळहळ

याप्रकरणी चौकशी केल्यावर समजले की, आरोपी एक अल्पवयीन मुलगी आहे. तिने स्वतः च्या आईला आणि काकूला त्या मुलाच्या वडिलांच्या तावडीतून वाचवण्यासाठी मुलाचे अपहरण केले. याप्रकरणी आरोपी अल्पवयीन मुलगी पोलिसांच्या ताब्यात आहे. तर आरोपी वडिलांवर मानवी तस्करी आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Salman Khan Galaxy Apt Firing: भाईजानच्या जिवाला धोका; बिश्नोई गँगच्या रडारवर सलमान खान? काय आहे प्रकरण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com