Mumbai Crime: मुंबईत 'स्पायडर मॅन'ला अटक; पाइपवरुन चढायचा अन् हात साफ करायचा; ३७ लाखांचं सोनं जप्त

Malad Crime News: मालाडमधून एका चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. हा चोर स्पायडरमॅनसारखा लोकांच्या घरात शिरायचा आणि चोरी करायचा. पोलिसांनी १२ तासातच चोरट्याला अटक केली आहे.
Mumbai Crime
Mumbai CrimeSaam TV
Published On

संजय गडदे, साम टीव्ही प्रतिनिधी

मालाड पश्चिम, मुंबईतील रामबाग लेन ॲडव्हान्स पलाझो बिल्डिंगमध्ये मध्यरात्री स्पायडरमॅनप्रमाणे इमारतीवर चढून चोरी करणाऱ्या चोरट्याला मालाड पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत अटक केली. मालाड पोलिसांनी चोराकडून 36 लाख 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि हिरे जप्त केले आहे.

मालाड पोलिसांनी सापळा रचून जोगेश्वरी रेल्वे स्थानकाच्या रुळांवर फिल्मी शैलीत १ किलोमीटर धावून आरोपीला अटक केली. संतोष सुरेश चौधरी उर्फ वैतू (23) असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यात 30 पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून आरोपीने अजून कुठे चोरी किंवा इतर कोणता गुन्हा केला आहे का याचा तपास घेत आहेत.

Mumbai Crime
Baramati Crime: लग्नासाठी दबाव, कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी; गावातील तरुणांच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार, 10 एप्रिल रोजी मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रामबाग लेन ॲडव्हान्स पलाझो बिल्डिंगमध्ये मध्यरात्री स्पायडरमॅनप्रमाणे इमारतीवर चढून घरफोडी झाल्याची घटना घडली होती याप्रकरणी फिर्यादी यांनी मालाड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दिली. गुन्ह्याचे गांभीर्य पाहून मालाड पोलिसांनी तात्काळ घरफोडीचा गुन्हा नोंद करून तपासाची सुरुवात केली.

मालाड पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षातील तपास अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. 100 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, तांत्रिक विश्लेषण आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या मदतीने आरोपीच्या चेहऱ्याची ओळख पटवली. यानंतर खबऱ्याच्या मदतीने आरोपीची माहिती घेतली असता आरोपी जोगेश्वरी रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे रुळालगत असलेल्या झोपडपट्टीमध्ये राहत असल्याची समजले.

माहितीची खातरजमा करून मालाड पोलिसांनी सापळा रचून जोगेश्वरी रेल्वे स्थानकाच्या रुळांवर फिल्मी शैलीत १ किलोमीटर धावून आरोपीला अटक केली. संतोष सुरेश चौधरी उर्फ वैतू (23) असे अटक आरोपीचे नाव आहे. जो अंधेरी पश्चिम येथील रहिवासी आहे. आरोपींकडून 36 लाख 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि हिरे जप्त करण्यात आले आहेत.

Mumbai Crime
Pune Crime : ५ कोटी दे नाहीतर...; पुण्यातील नामांकित बिझनेसमॅनला पाकिस्तानमधून खंडणीचा फोन; शहरात खळबळ

मालाड पोलिसांच्या तपासात आरोपींवर ३० हून अधिक चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. चोरटे काही मिनिटांत चोरी करून पळून जायचे. मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आत्तापर्यंत सर्व चोरीच्या घटना आरोपींनी कुठे केल्या आहेत व या चोरीच्या घटनेत आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा तपास मालाड पोलीस करत आहेत.

Mumbai Crime
Mumbai Indians च्या खेळाडूंची एकच धावपळ, रोहित शर्मा सर्वांना ओरडून ओरडून बोलवताना दिसला; Video Viral

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com