Malad : पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसठी खुशखबर! मालाड स्थानकाला दोन्ही बाजूला प्लॅटफॉर्म, गर्दीने भरलेल्या विरार लोकलमध्ये चढणं होणार सोपे

Western Railway News: आता मालाड स्थानकावरुन दोन्ही बाजूने फलाट उभारण्यात आला आहे. त्यामुळे आता मालाडला ट्रेनमध्ये चढण्यासाठी होणारी गर्दी विभागणार आहे.
Malad
MaladSaam Tv
Published On

मुंबई हे गजबलेले शहर आहे. मुंबईत सर्वाधिक लोक हे रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो. गर्दीतून प्रवास करणे हे खूप जोखमीचे काम आहेत. त्यात गर्दी असताना ट्रेनमध्ये चढणे हे खूप मोठे काम आहे. दरम्यान, आता पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. सर्वात गर्दीची समजल्या जाणाऱ्या विरार धीम्या लोकलमध्ये मालाड येथे चढणे-उतरणे अधिक सोपे होणार आहे.

Malad
Indian Railway : रेल्वेचं प्रवाशांना गिफ्ट! उन्हाळी सुट्यांनिमित्त धावणार तब्बल ३३२ विशेष रेल्वेगाड्या, वेळापत्रक पाहा एका क्लिकवर

पश्चिम रेल्वेवरील मालाड स्थानकावरील नवीन फलाटाचे काम पूर्ण झाले आहे. हा प्लॅटफॉर्म आता प्रवाशांसाठी खुला झाला आहे. यामुळे आधी मालाडच्या फक्त एका प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी असायची. दरम्यान, आता ही गर्दी विभागणार आहे.त्यामुळे प्रवाशांना दोन्ही बाजूच्या प्लॅटफॉर्मवरुन चढता येणार आहे.

पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव ते कांदिवली या दरम्यान मालाड स्थानकाच्या पश्चिमेला सहावी मार्गिका उभारण्यात आली आहे.यावरुन आता रेल्वेगाड्या धावत आहे. यामुळे पूर्वाचा होम फलाट आता बेट फलाट झाला आहे. म्हणजेच दोन्ही दिशेला आता प्लॅटफॉर्म असणार आहे.

सध्या या दोन्ही प्लॅटफॉर्मवर जर एकाच वेळी लोकल आली तर प्रवाशांची गर्दी होते. ही गर्दी विभागण्यासाठी मालाडमध्ये दोन्ही बाजूला प्लॅटफॉर्म उभारण्यात आले आहे. तात्पुरता पोलादी फलाट उभारण्यात आला आहे. हा फलाट २२७ मीटर लांब आणि ४ ते ६ मीटर रुंद आहे. २०२४ मध्ये या फलाटाचे काम सुरु झाले. आता हे काम पूर्ण झाले आहे.

Malad
Hydrogen Train: देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनची ट्रायल सुरू; 'या' मार्गावर धावणार पर्यावरण पुरक रेल्वे

लवकरच हार्बर अन् वेस्टर्न लाइन जोडणार

आता हार्बर मार्गाचा विस्तार हा बोरिवलीपर्यंत करण्याचे नियोजना आहे. याचे काम सुरु झाल्यानंतर मालाड स्टेशनवरील हा फलाट हटवावा लागणार आहे. फलाट उभारण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे तात्पुरता पोलादी फलाट बांधण्यात आला आहे, असं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Malad
Karjat Railway Station : पहिला घास खाताच संशय आला, बघितल्यानंतर वडापावमध्ये आढळला साबणाचा तुकडा; रेल्वे स्टेशनवरील धक्कादायक प्रकार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com