
मुंबईमधील एका प्रसिद्ध शाळेमध्ये इंग्रजी शिकवणाऱ्या महिला शिक्षिकेने विद्यार्थ्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. गेल्या वर्षभरापासून ही शिक्षिका विद्यार्थ्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवत होती. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या शिक्षिकेविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत तिला अटक केली.
ही शिक्षिका ४० वर्षांची असून तिचे लग्न झाले आहे. तिला मुलं देखील आहेत. तिने ११वी मध्ये शिकणाऱ्या १६ वर्षांच्या मुलासोबत जबरदस्ती शरीरसंबंध ठेवले. पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, डिसेंबर २०२३ शाळेमध्ये झालेल्या वार्षिक कार्यक्रमासाठी डान्स ग्रुप तयार करण्यासाठी झालेल्या मिटिंगवेळी ही शिक्षिका विद्यार्थ्याकडे आकर्षित झाली. तिने जानेवारी २०२४ मध्ये या विद्यार्थ्यासोबत पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवले.
या घटनेनंतर विद्यार्थी प्रचंड घाबरला होता. त्याने या शिक्षिकेपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. दहावी पास झाल्यानंतर विद्यार्थ्याने शाळा सोडली. त्यानंतर देखील ही शिक्षिका या विद्यार्थ्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत होती. त्यासाठी तिने एका मैत्रिणीची मदत घेतली. पोलिसांनी या महिला शिक्षिकेच्या मैत्रिणीवर देखील गुन्हा दाखल केला.
या महिला शिक्षिकेने या विद्यार्थ्याला सांगितले होते की, तू आणि मी एकमेकांसाठी बनलो आहोत. ही शिक्षिका या विद्यार्थ्याला कारमधून घेऊन जायची आणि निर्जनस्थळी नेऊन त्याच्यासोबत शरीरसंबंध ठेवत होती. अनेकदा तिने या मुलाला दारू पाजून फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये देखील नेले होते. विद्यार्थी जेव्हा जास्तच टेन्शनमध्ये राहू लागला तेव्हा या शिक्षिकेने त्याला अँटी एन्जायटी पिल्स दिल्या. पोलिसांनी त्या गोळ्याही जप्त केल्या.
मुलाचे सतत शांत राहणे, कशातच मन रमत नसल्यामुळे त्याचे आई-वडील चिंतेत आले. त्यामुळे त्यांनी त्याची विचारपूस केली असता त्याने शिक्षिकेचे हे धक्कादायक कृत्य सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.