Mumbai Crime News : कोलकाता येथील डॉक्टरप्रमाणे तुझेही हाल करू, मुंबईतील महिला डॉक्टरला धमकी

Threatened to woman doctor in Mankhurd : मुंबईतील एका महिला डॉक्टरला धमकी मिळाली आहे. त्यामुळे मानखुर्दमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मुंबईतील महिला डॉक्टरला धमकी
Mumbai Crime NewsSaam Tv
Published On

सचिन गाड, साम टीव्ही मुंबई

कोलकाता येथील आर.जी.कर वैद्यकीय महाविद्यालयातील एका डॉक्टर महिलेवरील बलात्काराची घटना अजून ताजी आहे. दरम्यान आता मुंबईमधील एका महिलेला अशीच धमकी मिळाली. मानखुर्दमधून हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. यामुळे मानखुर्दमधील साठेनगर परिसरात मोठे गोंधळाचे वातावरण आहे. आपण या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेवू या.

नेमकं काय आहे प्रकरण?

याबाबत सविस्तर वृत्त असं की, कोलकाता येथील डॉक्टरप्रमाणे तुझेही हाल करू, अशी धमकी मुंबईतील एका महिला डॉक्टरला मिळालेली (Mumbai News) आहे. मानखुर्दच्या साठेनगर परिसरामधून हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कोलकत्ता येथील डॉक्टरप्रमाणे हाल करण्याची धमकी देण्यात आल्यामुळे महिला डॉक्टर घाबरली अन् तिने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

धमकी देण्यामागे काय आहे कारण?

मिळालेल्या माहितीनुसार संबंधित डॉक्टर महिलेचा काही व्यक्तींसोबत क्लिनिकसमोर दुचाकी पार्क करण्यावरून वाद झाला होता. या वादामध्ये महिला डॉक्टरला शिवीगाळ अन् मारहाण देखील आरोपींनी केली (crime news) होती. तसेच या डॉक्टर महिलेला क्लिनिक जाळून टाकण्याची धमकी देखील त्यांनी दिली होती. पीडित डॉक्टर महिलेने तरुणासह तिन महिलांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

मुंबईतील महिला डॉक्टरला धमकी
School Girl Molested By Teacher : नटून थटून आलेल्या मुलीवर शिक्षकाचा पडला डाेळा, टाकला हात; पाेलिस तपास सुरु

संपूर्ण राज्यात अत्याचार प्रकरणाचे पडसाद

कोलकाता आणि बदलापूरमधील अत्याचार प्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत (threatened to woman doctor in Mankhurd) आहेत, अशातच मात्र आता मुंबईमध्ये महिला डॉक्टरला धमकी मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मागील आठवड्यात राज्यामध्ये अनेक ठिकाणी लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्याचं समोर आलं (Physically Abused) होतं. त्यानंतर मोठ्या संख्यने नागरिक रस्त्यावर उतरले होते. संतापाचे तीव्र पडसाद अजूनही उमटत आहेत. ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलने केले जात आहेत.

मुंबईतील महिला डॉक्टरला धमकी
Molested : दहावीतील विद्यार्थिनीवर घडलेल्या प्रसंगामुळे पालक संतापले; शिक्षकावर शाळा कारवाई करणार का ?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com