Mumbai News: भटक्या कुत्र्यामुळं खुनाच्या घटनेचं रहस्य उलगडलं! धक्कादायक कारण आलं समोर

Stray Dog Helps Cops: नवी मुंबईमध्ये भटक्या कुत्र्याच्या मदतीने पोलिसांनी एका खून प्रकरणाची उकल केली आहे. त्यांनी कचरा वेचणाऱ्या व्यक्तीचा खून करणाऱ्या मारेकऱ्याला कुत्र्याच्या साहाय्याने पकडले आहे.
Stray Dog Helps Cops
Stray Dog Helps CopsSaam Tv

नवी मुंबईमध्ये भटक्या कुत्र्याच्या (Stray Dog) मदतीने पोलिसांनी एका खून प्रकरणाची उकल केली आहे. त्यांनी कचरा वेचणाऱ्या व्यक्तीचा खून करणाऱ्या मारेकऱ्याला कुत्र्याच्या साहाय्याने पकडले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये एक भटका कुत्रा संशयितासह दिसल्यानंतर नेरूळ पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला (Mumbai Crime) होता.

एका कचरा गोळा करणाऱ्या व्यक्तीच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यास भटक्या कुत्र्याने मदत केली (Crime News) आहे. नेरुळचे वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत यांनी माहिती दिली की, १३ एप्रिल रोजी एका कचरा वेचणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. त्याच्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करण्यात आला. केबल वायरचा वापर करून त्याचा गळा दाबून खून करण्यात आला (Mumbai Crime News) होता.

पोलिसांना हा मृतदेह नेरुळ बस डेपोजवळील भाजी मंडईजवळ सापडला होता. याप्रकरणी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये एक व्यक्ती लोखंडी रॉडने मृत व्यक्तीवर हल्ला करताना दिसत (Stray Dog Helps Cops) आहे. या हल्लेखोरासोबत एक भटका कुत्रा होता. तो हल्लेखोरावर भुंकला नाही. तो कुत्रा हल्लेखोराचा पाळीव असल्याचा पोलिसांना संशय आला.

पोलिसांनी परिसरात चौकशी केली तेव्हा एका फुटपाथवर राहणाऱ्या व्यक्तीने त्या भटक्या कुत्र्याला ओळखले. तो नेहमी भुऱ्या नावाच्या माणसासोबत राहतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक भगत यांनी सांगितले की, संशयित भुऱ्याला (Killer) १५ एप्रिलला दोन दिवसांच्या शोधानंतर ताब्यात घेण्यात आलं. त्याने मनोज प्रजापती (४२) असं स्वत:ची ओळख असल्याचं सांगितलं.

Stray Dog Helps Cops
Dombivali Crime: सततच्या त्रासाला कंटाळून बापानेच काढला मुलाचा काटा; डोंबिवलीमधील धक्कादायक घटना

तो भाजीपाला विक्रेत्यांसाठी साफसफाईची किरकोळ काम करून उदरनिर्वाह करत असल्याचं त्याने सांगितलं. त्याने नेरूळ रेल्वे फूट ओव्हर ब्रिजवर झोपेत असलेल्या कचरा गोळा करणाऱ्या व्यक्तीने (Ragpickers) मारहाण करून त्याचे पैसे जबरदस्तीने हिसकावून घेण्यासाठी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची कबुली दिली.

त्यामुळे आरोपीने त्याला ठार मारण्याचा कट रचला. त्यानंतर हा गुन्हा घडवून आणला. प्रजापतीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत (crime) आहे. आरोपीसोबत असलेल्या भटक्या कुत्र्याची ओळख पटवणाऱ्या फुटपाथवर राहणाऱ्या व्यक्तीला या प्रकरणात साक्षीदार करण्यात आलं आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक भगत यांनी दिली आहे.

Stray Dog Helps Cops
Nandurbar Crime: नवापूरमधील लाचखोर पीआयला अटक; नाशिक एसीबीची कारवाई; नागरिकांची पोलीस गाडीवर दगडफेक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com