Dombivali Crime: सततच्या त्रासाला कंटाळून बापानेच काढला मुलाचा काटा; डोंबिवलीमधील धक्कादायक घटना

Dombivali Crime : मुलाच्या त्रासाला कंटाळून वडिलांनीच पोटच्या मुलाची हत्या केल्याची घटना डोंबिवलीत घडलीय.
Dombivali Crime:  सततच्या त्रासाला कंटाळून बापानेच काढला मुलाचा काटा; डोंबिवलीमधील धक्कादायक घटना

अभिजीत देशमुख,

डोंबिविली : दारू पिऊन दररोज मारहाण करणाऱ्या मुलाला बापानेच हत्या केली. मारहाण करत मुलाची नायलॉनच्या दोरीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पश्चिमेकडील सरोवर नगर परिसरात घडलीय. हरेष पाटील असे मयत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी मारेकरी वडिलांना अटक केलीय.

अभिमन्यू पाटील असे मारेकरी वडिलांचे नाव आहे. मुलाच्या हत्येप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी हत्या करणाऱ्या अभिमन्यू पाटील याला बेड्या ठोकल्यात. धक्कादायक म्हणजे हा प्रकार लपवण्यासाठी घरातील शीडीवरुन पडून गंभीर दुखापत झाल्याने हरेषचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांना देण्यात आली होती. मात्र पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी तपास सुरू केला त्यानंतर धक्कादायक प्रकार उघडीस आला.

डोंबिवली पश्चिमेतील गरिबाचा पाडा सरोवरनगर परिसरात अभिमन्यू पाटील हे आपल्या कुटुंबासह राहतात. अभिमन्यू पाटील यांच्या घरात त्यांची पत्नीसह त्यांची दोन मुले राहतात. मोठा मुलगा हा गावी आहे. लहान मुलगा हरिष याला दारुचे व्यसन होते. दररोज तो दारुच्या नशेत घरी यायचा आणि आई वडिलांशी भांडण करीत होता. मंगळवारी रात्री हरीष घरी आला. रात्री वडिलांसोबत त्याचे भांडण झाले.

या भांडणादरम्यान हरीषची आई हे भांडण पाहून बाहेर निघून गेली. काही वेळाने आई घरात आली असता हरीष घरात जखमी अवस्थेत पडला असून त्याचा मृत्यू झाल्याचे पाहिले. या घटनेची माहिती विष्णूनगर पोलिसांना याची माहिती दिली गेली. पोलिसांनी या प्रकरणात हरेषचा मृतदेह पोस्टमार्टेम करीता पाठविला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

दरम्यान हरिषचे वडील अभिमन्यू यांनी सुरुवातीला घराला लागून असलेल्या शिडीवरुन खाली पडल्याने दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं वाटत होतं. मात्र पोलिसांच्या मनात संशयांची पाल चुकचूकली आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला. डोंबिवलीचे एसीपी सुनिल कुराडे, विष्णूनगर वरिष्ठ पोलिस निरिक्षक संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी दीपविजय भवार यांनी सुरू केला. पोलीस तपासात धक्कादायक खुलासा झाला.

हरिष दररोज पिऊन येऊन आई वडिलांना मारहाण करीत होता. शिवीगाळ करीत होता. अखेर मंगळवारच्या रात्री वाद विकोपाला गेला वडिलांची सहनशीलता संपली. वडिलांनी एका दांडक्याने दारुच्या नशेत असलेल्या हरिषच्या डोक्यावर प्रहार केला. त्यात तो जखमी झाला. तो खाली पडला. नंतर नायलॉनच्या दोरीने गळा आवळून त्याची हत्या केली. विष्णूनगर पोलिसांनी अभिमन्यू पाटील याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरु आहे.

Dombivali Crime:  सततच्या त्रासाला कंटाळून बापानेच काढला मुलाचा काटा; डोंबिवलीमधील धक्कादायक घटना
Nandurbar Crime : रस्त्याशेजारील नाल्यात आढळला युवकाच्या मृतदेह; नंदूरबारमधील खळबळजनक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com