सचिन गाड, साम टीव्ही मुंबई
राज्यात चिमुकल्यांवरील अत्याचाराचे सत्र सुरूच आहे. ठाणे, मुंबई, अहमदनगर आणि नागपूरमधून या आठवड्यात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. बदलापुरातील घटनेचे पडसाद अजून शमले नाही, तोच पुन्हा मुंबईत दिव्यांग अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आलीय. कांदिवलीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
दिव्यांग अल्पवयीन मुलीवर अत्याचार
कांदिवली येथे दिव्यांग अल्पवयीन अपंग मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना (Mumbai crime news) घडली. मुलीचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते, हीच संधी साधत शेजारच्या व्यक्तीने संधी साधत पीडितेच्या घरामध्ये प्रवेश केला. जबरदस्ती घरात प्रवेश करत आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. घटनेनंतर अल्पवयीन मुलगी घाबरून गेली होती.
२३ वर्षीय नराधमाला अटक
घडलेल्या प्रकाराने मुलगी काही दिवस काही बोलत नव्हती, त्यामुळे तिच्या आईला शंका आली. आईने मुलीला धीर देऊन विचारणा केली असता त्यांच्या पायाखालील जमिन सरकली. पीडित मुलीने आईला घडलेला धक्कादायक प्रकार (minor disabled girl physically abused) सांगितला. तिच्या आईने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी कुरार पोलिसांनी केली २३ वर्षीय नराधमाला अटक केलीय. मुंबईत महिला आणि मुलींच्या सुरक्षेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत (physically abused) आहे.
कांदिवलीतील संतापजनक घटना
कुरार पोलिसांनी २३ वर्षीय आरोपीला भारतीय न्याय संहिता कलम ७४ (विनयभंग) आणि ३३३ (ट्रेसपासिंग) सह बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या कलम ८,१२ अंतर्गत अटक केलीय. बदलापुरातील घटनेमुळे राज्यामध्ये संतापाची लाट आहे. नागरिक आक्रमक होत रस्त्यावर उतरले होते, त्यानंतर पुन्हा आता मुंबई आणि नागपुरमधून चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या धक्कादायक घटना समोर आल्या (crime news) आहेत. या घटनांमुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. नराधमांना कायद्याचं कोणतंही भय राहिलं नसल्याचं दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.