Ambarnath Crime: खळबळजनक! अंबरनाथ MIDCमधून तब्बल २५ लाखांची ॲल्युमिनिअम तार चोरीला; ११ जण अटकेत

Ambarnath Latest News: ट्रांसमिशनसाठी लावलेल्या २५ लाख रुपयांच्या ॲल्युमिनिअमच्या तारा काही अज्ञात चोरट्यांनी चोरल्या होत्या. याप्रकरणी अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Ambarnath Crime: खळबळजनक! अंबरनाथ MIDC मधून तब्बल २५ लाखांची ॲल्युमिनिअम तार चोरीला; ११ जण अटकेतasnagar Crime
Ambarnath Latest NewsSaam tv

ठाणे, ता. ११ जून २०२४

अंबरनाथ एमआयडीसीमधून तब्बल २५ लाखांची ॲल्युमिनिअमची तार चोरी केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. या संबंधी अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करत 11 आरोपींना मुंबईतील धारावी मधून अटक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नॅशनल पॉवर ग्रिड अंतर्गत मुंबई ऊर्जा लिमिटेड ही कंपनी राष्ट्रीय पातळीवरचा एक महत्वाचा प्रोजेक्ट राबवत आहे. या कंपनीसोबत ट्रांसमिशनसाठी केईसी इंटरनेशनल लिमिटेड ही कंपनी सब कॉन्ट्रक्टर म्हणून काम करत आहे. या कंपनीचे अंबरनाथ एमआयडीसीमध्ये प्रोजेक्टचे काम सुरू आहे.

अशातच २७ आणि २८ मे च्या रात्री साइटवरून ट्रांसमिशनसाठी लावलेल्या २५ लाख रुपयांच्या ॲल्युमिनिअमच्या तारा काही अज्ञात चोरट्यांनी चोरल्या होत्या. याप्रकरणी अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तातडीने सूत्र हलवत सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने ११ आरोपींना अटक केली असून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Ambarnath Crime: खळबळजनक! अंबरनाथ MIDC मधून तब्बल २५ लाखांची ॲल्युमिनिअम तार चोरीला; ११ जण अटकेतasnagar Crime
Shirpur Crime News : अज्ञातांकडून झालेल्या गोळीबारात प्राध्यापक गंभीर; शिरपूर तालुक्यातील घटना

पोलिसांनी घटनेतील आरोपी आणि सराईत गुन्हेगार तौकीर जमालुद्दीन खान याच्यासह सरोजकुमार जयस्वार, गणेश पटेल, अरुण सिंग, आकाश मीना, समीर खान,विकास म्हेत्रे, परवेझ खान, शिवकरण गुप्ता, रामलाल पटेल, कादर खान आणि सद्दाम अली यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरला गेलेल्या अल्युमियमच्या तारा, गुन्ह्यात वापरलेली कार, १ पिकअप आणि २ मिनी टेम्पो असा जवळपास 29 लाख रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात आला आहे.

Ambarnath Crime: खळबळजनक! अंबरनाथ MIDC मधून तब्बल २५ लाखांची ॲल्युमिनिअम तार चोरीला; ११ जण अटकेतasnagar Crime
Pune News: पहिल्याच पावसात पुणे तुंबलं, मनसे आणि काँग्रेस आक्रमक; होडीमध्ये बसून आंदोलन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com