पहिल्याच पावसाने पुण्याला (Pune Rain) झोडपून काढले. शनिवारीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुणे जलमय झाले होते. पुणे शहरात होणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. परिणामी नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या सगळ्या गोष्टीला महापालिका जबाबदार असल्याचा आरोप करत मनसेकडून आज पुणे महानगर पालिकेवर आंदोलन करण्यात आले. त्याचसोबत पुण्यात झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचत आहे याचा जाब विचारण्यासाठी आता काँग्रेससुद्धा मैदानात उतरले आहे. पावसामध्ये पुण्यात पाणी साचत असल्यामुळे आता मनसे आणि काँग्रेस आक्रमक झाले आहेत.
पुण्यामध्ये पावसामुळे पाणी साचत असल्यामुळे आता मनसे आणि काँग्रेस आक्रमक झाले आहेत. मनसैनिकांनी चक्क एक नाव घेऊन त्याच्यात बसून पुणे महानगर पालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली. येत्या काळात जर कामं झाली नाहीत तर मनसे स्टाईलने पुन्हा एकदा आंदोलन करू असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला. 'पुणेकरांना वेठीस धरू नका, नाहीतर आम्ही मनसे स्टाईलने आंदोलन करू.', असा त्यांनी आयुक्तांना इशारा दिला.
पुण्यात झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचत आहे. याचा जाब विचारण्यासाठी आता काँग्रेससुद्धा मैदानात उतरले आहे. पुणे शहर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली. पुण्यात नालेसफाई का होत नाहीये? असा सवाल काँग्रेस कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांना विचारला. आपत्ती विभागाबाबत कॉल सेंटर सुरू करा.', अशी मागणी काँग्रेसने महापालिका आयुक्तांकडे केली.
महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी सांगितले की, 'एकाच दिवशी पुण्यात ११० मिमी पाऊस झाला. यानिमित्ताने अनेक निवेदन आणि तक्रारी आमच्याकडे आज प्राप्त झाले. यासंदर्भात राजकीय पक्षाचे अनेक निवेदन आले आहेत. उपायुक्त दर्जाचे एक अधिकारी आपत्ती व्यवस्थापन संदर्भात आता रात्री ८ ते सकाळी ८ पर्यंत राहतील. ड्रेनेज, रोड, विभागाचे समन्वय आता इथून पुढे राहील. १७५ नाले साफ करून झाले आहेत. ३ एचपी पंप आपल्याकडे आहेत ज्यामुळे आता पाणी बाहेर निघेल. अनधिकृत होर्डिंग्जसंदर्भात आम्ही कारवाई करत आहोत.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.