
कुख्यात गुंड डी के रावला मुंबई गुन्हे शाखेने अटक केले आहे. खंडणीप्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.डी के राव याने एका हॉटेल व्यवसायाकडून अडीच कोटींच खंडणी मागितली होती. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आले आहे.
हॉटेल व्यवसायाला खंडणी दे नाहीतर जीवे मारु,अशी धमकी दिली होती. खंडणी नाही दिली तर हॉटेलचा ताबा घेऊ असं धमकावून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी डी के रावला अटक केली आहे.
डी के रावसह त्याच्या सहा साथीदारांनाही अटक केली आहे. खंडणी, फसवणूक आणि फॉर्जरी प्रकरणी डी के रावला अटक केली आहे.तो कुख्यात गुंड डॉन छोटा राजनसोबत काम करायचा. डी के रावला आज कोर्टात दाखल केले जाणार आहे. त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिताअंतर्गत विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत.
डी के राव हा कुख्यात गुंड आहे. त्याने अनेक गुन्हे केले आहेत. दरोडा,खंडणी या प्रकरणांमध्ये त्याचा समावेश होता. मुंबईतील व्यापारी आणि विकासकांना टार्गेट करुन खंडणीचे रॅकेट चालवण्यात त्याचा हहात होता. गेल्या काही वर्षात त्याला अनेका अटक केली होती.
यापूर्वीही छोटा राजनच्या टोळी काम करणाऱ्या विलास बाळाराम पवार याला अटक केली होती. त्याला चेंबूर परिसरातील देवनार पोलिस स्टेशनच्या पथकाने पकडले होते. मिळालेल्या माहितीनुसार,पवारने १९९२ मध्ये एका व्यक्तीला गोळ्या झाडल्या होत्या. याप्रकरणी त्याला अटक केली होती. २००८ साली त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर तो फरार होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.