Crime News: काका-पुतणीला रात्री एकाच खोलीत पकडले, सकाळी दोघे फरार; बापाने उचलले टोकाचे पाऊल

Minor girl case India: उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये अल्पवयीन मुलीसंबंधी धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. मुलगी सुरक्षित सापडली असून तिचे जबाब आणि वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
Minor girl case India
Minor girl case IndiaSAAM TV
Published On

उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यातील खुटारमध्ये एक धक्कादायक घटना घडलीये. याठिकाणी कुटुंबाने काकाने तिच्या सख्ख्या १६ वर्षीय पुतणीसोबत रंगेहात पकडलं आहे. या घटनेनंतर तो पहाट होण्यापूर्वी मुलीसोबत फरार झाला्याची माहिती आहे. या घटनेमुळे मुलीच्या वडिलांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहेत. यासंदर्भात पोलीस फरार काकाच्या शोधात आहे.

मध्यरात्री घडला धक्कादायक प्रकार

शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. घरात सर्वजण शांत झोपले होते. त्यावेळी रात्री दीडच्या सुमारास मुलीच्या आईला अचानक जाग आली. तिने मुलीच्या खोलीची लाईट सुरु असल्याचं पाहिलं. ती गाणं गुणगुणत असल्याने आईला संशय आला म्हणून तिने पतीला उठवलं.

यावेळी दोघांनी मिळून मुलीच्या खोलीची तपासणी केली असता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या रूममधील बेडच्या खाली तिचा सख्खा काका लपून बसला होता. मुलीच्या पालकांनी तिला त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो त्यांना ढकलून पळून गेला.

पहाटेच मुलगीही घरातून गायब

या घटनेनंतर कुटुंबातील सर्वजण तणावात होते. यावेळी पालकांनी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र पहाटे जवळपास ४ च्या सुमारास मुलगी घरातून पळून गेल्याचं समजलं. सकाळी शोधाशोध केल्यानंतर तिला काकाही घरी नसल्याचं कुटुंबाच्या लक्षात आलं. मुलीच्या वडिलांनी तातडीने पोलीस ठाण्यात जाऊन भावाविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणसोबत इतर कलमांखाली गुन्हा दाखल करून शोध सुरु केला.

वडिलांचा आत्महत्येचा प्रयत्न

एकीकडे पोलीसांचा तपास सुरु असताना दुसरीकडे मुलीचे वडील मात्र पूर्णपणे खचून गेल्याचं पाहायला मिळालं. आपल्या मुलीचे सख्ख्या भावाशी असलेलं नातं आणि त्यामुळे समाजातील होणारी बदनामी पाहता त्यांनी विषप्राशन केलं. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना कुटुंबियांनी रूग्णालयात हलवलं.

फरार काकाचा शोध सुरु

पोलिसांच्या जलद कारवाईमुळे संध्याकाळपर्यंत मुलगी सुरक्षितपणे सापडली. सध्या तिचे जबाब नोंदवण्याची आणि वैद्यकीय तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी सांगितलं की, आरोपी काकाला पकडण्यासाठी विविध ठिकाणी छापे टाकले जातायत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com