Uttar Pradesh Crime : वर्दी चोरून 'पोलीस' झाला; रस्त्यावर करू लागला वाहनांची तपासणी, एका चुकीने जाळ्यात अडकला
Uttar Pradesh Crime News :
उत्तर प्रदेशच्या कौशांबी जिल्ह्यातून अजब प्रकार समोर आला आहे. या चोरट्याची चोरीची पद्धत ऐकून तुम्ही चकीत व्हाल. या चोरट्याने पोलिसांची वर्दी चोरून लोकांना पोलीस असल्याचं भासवू लागला. त्यानंतर एका रस्ताच्या कोपऱ्यावर उभा राहून वाहनचालकांकडून दंडवसुली करू लागला. या पोलिसांनी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या.
नेमकं काय घडलं?
मीडिया रिपोर्टनुसार, कौशांबीमध्ये पोलीस शिपाई नीलेश कुमार कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहे. त्याची ड्युटी ११२ साठी सुरू होती. नीलेश हे मूरतगंज या गावात रामेश्वर केसरवानी यांच्या घरात भाडेतत्वावर राहतात. ३० मार्चला ३ वाजता ड्युटी संपवून घरी पोहोचले. त्यानंतर वर्दी घरात ठेवून बाजरात गेले. घरी आल्यावर त्यांना वर्दी चोरीला गेल्याचे कळाले. या चोराने बुटे, पट्टा, बॅच देखील चोरून नेली.
शिपाई निलेश यांना घरी आल्यावर मोठा धक्का बसला. निलेश यांना घरात वर्दी दिसली नव्हती. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत चोरट्याला अटक केली.
चोरटा गजाआड
चोरटा रस्त्यावर उभा राहून वाहनाचालकांवर रुबाब झाडत होता. तसेच त्यांच्याकडून बेकायदेशीररित्या दंडवसुली देखील करत होता. एका वाहनचालकाला संशय आला, त्याने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांना पाहून चोरटा पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला पकडला. पोलिसांनी त्याला ठाण्यात नेऊन त्याची चौकशी केली. त्याने पोलिसांत त्याचे नाव वीरेंद्र सौराई असल्याचे सांगितलं. पोलिसांनी या चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंद करून गुन्हा नोंद केला आहे. या घटनेने वाहन चालकांमध्ये खळबळ उडाली होती. मात्र, कारवाई केल्यामुळे चालकांनी पोलिसांचं कौतुक केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.