UP Crime: दिवसा पत्नीसोबत होळीची खरेदी, रात्री उशीने तोंड दाबून बायकोचा घेतला जीव

UP Crime Man Killed His Wife: होळीची खरेदी करून आल्यानंतर एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केलीय. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केलीय.
UP Crime
UP Crime Man Killed His Wife
Published On

उत्तर प्रदेशच्या जैनपूरमध्ये एका व्यक्तीने उशीने पत्नीचं तोंड दाबून तिची हत्या केल्याची घटना घडलीय. पत्नीची हत्या केल्यानंतर तो पोलिसांना शरण आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू केलीय. आरोपीचं नाव आलोक सिंह (वय ३८), तर मृत पत्नीचे नाव अलका सिंह आहे.

आरोपी आलोक सिंह हा आपली पत्नी अलका आणि मुलासह मियापूरच्या परिसरात राहत होता. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी दोन्ही नवरा बायकोने आपल्या मुलासह होळीच्या खरेदीसाठी बाजारात गेले होते. खरेदी करून घरी आले. रात्रपर्यंत सर्व काही ठीक होतं. परंतु मध्यरात्री रागीट स्वभावाच्या आलोकने आपल्या पत्नीचं उशीने तोंड दाबून हत्या केली. त्यानंतर मुलाला घेऊन घरातून निघून गेला.

UP Crime
Nagpur Crime: रात्री घरी उशिरा का आला? दोन्ही भावात वाद वाढला, आईसमोरच मोठ्या भावाच्या डोक्यावर घातला विळा

दुसऱ्या दिवशी गुरुवारी आलोक स्वतः हून लाइन बाजारातील पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि पोलिसांना शरण झाला. त्याने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला. त्याने पत्नी अलकाचा खून केल्याचं पोलिसांना सांगितले. माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे प्रमुख सतीश सिंह आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घराचे कुलूप तोडून अलकाचा मृतदेह बाहेर काढला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवला.

बारसाठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करो गावात अलका सिंह यांचे माहेर आहे. घटनेची माहिती मिळताच त्याची आई पुष्पा सिंह रडत घटनास्थळी पोहोचल्या. लग्न झाल्यापासून आलोक अलकाला मारहाण आणि छळ करत होता, असा आरोप त्यांनी केलाय. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार आहे. या हत्येमागे घरगुती वाद किंवा अन्य काही कारण आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com