Sportsperson Rape : महिला खेळाडूवर २ वर्षांपासून लैंगिक अत्याचार, प्रशिक्षकासह ६० जणांवर आरोप

Kerala Sportsperson Rape : बाल कल्याण समितीच्या समुपदेशनात १८ वर्षीय तरुणीने मागील दोन वर्षांपासून अत्याचार होत असल्याचे सांगितले. समितीच्या सदस्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
Kerala 18 yrs old sportsperson rape case
Kerala 18 yrs old sportsperson rape caseSaam Tv
Published On

Kerala Sportsperson Rape Case : केरळमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. केरळच्या पाथनमथिट्टा येथे एका १८ वर्षीय महिला खेळाडूवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीवर मागील दोन वर्षांपासून अनेकदा बलात्कार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रशिक्षकांसह ६० हून अधिक लोकांनी पीडितेचे शोषण केल्याचा संशय पोलिसांना आहे.

केरळ पोलिसांनी शुक्रवारी (१० जानेवारी) या प्रकरणाची माहिती माध्यमांना दिली. पीडित महिला खेळाडू ही दोन महिन्यांपूर्वी १८ वर्ष पूर्ण केले. या तरुणीने 'वयाच्या सोळाव्या वर्षांपासून म्हणजेच मागील दोन वर्षांपासून अनेकांनी माझ्यावर अत्याचार केला' असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी लगेच या प्रकरणी सहा जणांना अटक केली असून या गंभीर गुन्ह्यात ६० पेक्षा जास्त लोकांचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पीडित तरुणीच्या शिक्षकांना तिच्या वागणुकीत लक्षणीय बदल झाल्याचे जाणवत होते. पुढे बाल कल्याण समितीच्या समुपदेशनादरम्यान हा प्रकार उघडकीस आला. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना बाल कल्याण समितीचे अध्यक्ष राजीव एन यांनी या घटनेवर भाष्य केले. ते म्हणाले, पीडित तरुणीने शालेय समुपदेशन सत्रात लैंगिक शोषणाबाबत खुलासा केला. त्यांनतर बाल कल्याण समितीच्या हस्तक्षेपानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पाथनमथिट्टा येथील क्रीडा शिबिरासह अनेक ठिकाणी प्रशिक्षक, वर्गमित्र आणि स्थानिक रहिवाशांनी सतत अत्याचार केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. तिच्याकडे वैयक्तिक मोबाईल फोन नसल्याने तिने वडिलांच्या फोनमध्ये तिच्यावर अत्याचार करणाऱ्या ४० लोकांचे नंबर सेव्ह केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Kerala 18 yrs old sportsperson rape case
Maharashtra Politics : मविआमध्ये फूट, ठाकरेंचा स्वबळाचा नारा, मुंबईपासून नागपूरपर्यंत एकला चलो रे

या प्रकरणी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये पोक्सो कायदा आणि फौजदारी कायदा यांच्या अंतर्गत खटले दाखल करण्यात आले आहेत. या संदर्भात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी दुसऱ्या प्रकरणात आधीपासूनच तुरुंगात आहे. दरम्यान पोलीस या गंभीर प्रकरणाचा तपास करत आहेत.

Kerala 18 yrs old sportsperson rape case
Heartbreaking : मोबईलनं घेतला बाप-लेकाचा जीव, एकाच दोरखंडाने दोघांनी जीवनयात्रा संपवली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com