Kalyan Crime
Kalyan CrimeSaam tv

Kalyan Crime: वाईन शॉपमधून दारु चोरायचा; बाहेर विकायचा.. कर्मचाऱ्यानेच घातला ६ लाखांचा गंडा

Kalyan Breaking News: अनिल कुंदनला ताब्यात घेतल्यानंतर त्याचे दोन साथीदार सुरेश पाचरणे आणि नरेश भोईर यांनाही क्राईम ब्रांच पोलिसांच्या पथकाने अटक केली.

अभिजित देशमुख, कल्याण|ता. १५ एप्रिल २०२४

वाईन शॉपमधून महागडी दारु चोरी करणाऱ्या तीन जणांना कल्याण क्राईम ब्रांचने अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे या वाईन शॉपमध्ये काम करणारा एक कर्मचारी दररोज पाच ते सहा हजार रुपयांची दारु चोरायचा व इतर दोन साथिदारांना ती बाहेर विकायला लावायचा. तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिसांनी चोरट्यांची ओळख पटवून त्याला बेड्या ठोकल्यात.

समोर आलेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील नेतविली परिसरातील जी.के वाईन शॉप आहे. गेल्या काही महिन्यांपासून वाईन शॉपमधील हिशोबात काही तरी गडबड होत असून जवळपास सहा लाखाची दारु चोरीला गेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर कोळसेवाडी पोलिसांसह कल्याण क्राईम ब्रांचही याचा तपास करीत होते. हा गुन्हा दाखल झाल्यापासून बारमधील कर्मचारी सुनिल कुंदन हा फरार झाला होता.

अशातच १३ एप्रिल रोजी पोलिस कर्मचारी गोरक्ष शेकडे यांना माहिती मिळाली की, सुनिल कुंदन हा एका ठिकाणी आहे. त्या ठिकाणाहून त्याला ताब्यात घेतले. सुनिल कुंदनला ताब्यात घेतल्यानंतर त्याचे दोन साथीदार सुरेश पाचरणे आणि नरेश भोईर यांना देखील क्राईम ब्रांच पोलिसांच्या पथकाने अटक केली.

Kalyan Crime
Maharashtra Election: मोदींबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत: अजित पवारांची विरोधकांवर टीका

अटकेनंतर समोर आलेल्या माहितीनुसार, सुनील कुंदन हा तरुण वाईन शॉप काऊंटरवर उभा राहायचा. त्याचे दोन मित्र एक दिवसा आड आलटून पालटून वाईन शॉपमध्ये दारु घेण्याच्या बहाण्याने जायचे. मालकासह इतर कर्मचाऱ्यांचे नजर चुकवत सुनिल चलाखीने पाच ते सहा हजाराची दारु या दोघांना द्यायचा. हे दोघेही ही दारू बाहेर विकायचे. कल्याण क्राईमने आत्तापर्यंत त्यांच्याकडून सहा लाखाची दारु जप्त केली आहे

Kalyan Crime
Parbhani: परभणी जिल्ह्यातील भूजलपातळी खालावली; मानवत, सेलू, पाथरीत भीषण स्थिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com