Maharashtra Election : मोदींबद्दल गैरसमज पसरवले जाताहेत; अजित पवार विरोधकांवर बरसले

AJit Pawar: कोल्हापूरमधील महायुतीच्या सभेत बोलताना अजित पवार यांनी विरोधकांवर तोफ डागली. नेहरू ते मोदींपर्यंत झालेल्या पंतप्रधानांच्या काळात घटनेमध्ये १०६ वेळा बदल करण्यात आलेत. हे विरोधकांना कळलं नाही का? असा सवाल अजित पवार यांनी विचारलाय.
Ajit pawar loksabha election
AJit Pawar in Kolhapur saam Tv
Published On

रणजीत माजगावकर, कोल्हापूर

कोल्हापूर : देशाचं संविधान बदलण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. त्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

विरोधकांकडून संविधान बदलण्याचा खोटा प्रचार सुरू आहे. सन २०१४ आणि २०१९ मध्येही तसेच केले, आता २०२४ मध्येही ते तसेच वागत आहेत. लोकांची दिशाभूल सुरू असून विरोधक मोदींबद्दल गैरसमज पसरवत आहेत, असा आरोप अजित पवार यांनी केला आहे. ते कोल्हापूर येथील महायुतीच्या सभेत बोलत होते.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानं जोर धरलाय. भाजप पुन्हा सत्तेत आला तर संविधान बदलण्यात येईल, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मोदींच्या हाती पुन्हा सत्ता देऊ नये, असे आवाहन विरोधकांकडून केले जात आहे. विरोधकांकडून सुरू असलेल्या टीकेच्या झोडीला तेवढंच तोडीस तोड उत्तर खुद्द पंतप्रधान मोदींनी अनेकदा दिलं आहे. इंडिया आघाडीवर तुकडे तुकडे गँग आहे. देशात फूट पाडण्याचे काम इंडिया आघाडीकडून केलं जात आहे, असा हल्लाबोल पंतप्रधान मोदी यांनी यवतमाळमधील सभेत बोलताना केला होता.

विरोधकांच्या संविधान बदलाच्या आरोपाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मोदींबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत. लोकांची दिशाभूल सुरू आहे. मोदींबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत. या खोट्या प्रचाराला बळी पडू नका, असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं आहे.

जवाहरलाल नेहरू यांच्यापासून नरेंद्र मोदींपर्यंत बऱ्याच दिग्गज व्यक्तींनी पंतप्रधानपद भूषवलं आहे. या सर्वांच्या काळात घटनेमध्ये १०६ वेळा बदल झालेले आहेत. त्यावेळेस तुम्हाला कळलं नाही का? असा परखड सवालही अजित पवार यांनी विरोधकांना विचारला.

Ajit pawar loksabha election
Ram Satpute: सोलापुरकरांनी ठरवलंय; माझं पार्सल दिल्लीला पाठवायचं..राम सातपुतेंचा धैर्यशील मोहितेंवर पलटवार!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com