Pune Fraud News: पृथ्वीवरुन थेट स्वर्गात जागा देतो.. नामांकित डॉक्टरची तब्बल ६ कोटींची फसवणूक; पुण्यात खळबळ

Pune Fraud News: स्वर्गात जागा मिळवून देतो म्हणून शहरातील एका नामांकित डॉक्टरची तब्बल सहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam TV

सागर आव्हाड|ता. १४ एप्रिल २०२४

Pune Fraud News:

पुणे शहरात एकीकडे गुन्हेगारी घटनांनी कळस गाठला असतानाच फसवणुकीचे प्रकारही समोर येत आहेत. अशातच स्वर्गात जागा मिळवून देतो म्हणून शहरातील एका नामांकित डॉक्टरची तब्बल सहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पीडित डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पुण्यातील कोंढवा परिसरात राहणारे हे ६७ वर्षीय डॉक्टर अनेक वर्ष विदेशामध्ये होते. भारतात परत आल्यानंतर त्यांनी आरोपींना आपली कौटुंबिक अडचण सांगितली. डॉक्टरांच्या अडचणीचा फायदा घेत आरोपींनी त्यांची तब्बल ६ कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक करण्यात आली.

आरोपींनी पृथ्वीवरून थेट स्वर्गात जागा मिळवायचे असेल तर मी सांगेल तसे तुम्ही करा, असे म्हणत वेळोवेळी भूलथापा देत डॉक्टरांची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत सहा जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Pune Crime News
Sushma Andhare: गृहमंत्री सर्वार्थाने नापास... सलमान खान गोळीबार प्रकरणावरुन सुषमा अंधारेंचे फडणवीसांवर टीकास्त्र!

अब्दुल मजीद शेख, यास्मिन शेख,इतैए श्याम शेख, अम्मा सादीक शेख आणि राजू आढाव अशी फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी आरोपींविरोधात पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत..

Pune Crime News
Bhandara Accident: भरधाव ट्रॅकच्या धडकेत शिक्षिका ठार, भंडारा जिल्ह्यात हळहळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com