Sushma Andhare: गृहमंत्री सर्वार्थाने नापास... सलमान खान गोळीबार प्रकरणावरुन सुषमा अंधारेंचे फडणवीसांवर टीकास्त्र!

Sushma Andhare On Salman Khan House Firing: कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
Devendra Fadnavis-Sushma Andhare
Devendra Fadnavis-Sushma AndhareSaam TV

पिंपरी चिंचवड, ता.१४ एप्रिल २०२४

आघाडीचा बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना आज पहाट घडली. या घटनेने सिने जगतासह राज्यभरात खळबळ उडाली आहे. या गोळीबाराच्या घटनेचे राजकीय वर्तुळातही पडसाद उमटत असून पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

"केवळ सेलिब्रिटीच नाहीतर सामान्य माणूस देखील भयभीत आहे. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. गावखेड्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. हजारो कोटींचे ड्रग्ज प्रकरणे उघडकीस आली ड्रग्सचे नेक्सस अजून बाहेर का येत नाहीत? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे सर्वार्थाने नापास झालेत. त्यांच्याबाबत काय बोलणार?" अशी टीका सुषमा अंधारे यांनी यावेळी केली.

यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यावरुनही जोरदार टीका केली. "जितना बडा भ्रष्टाचारी उतनी बडी एन्ट्री यही मोदी की गॅरंटी आहे. विरासत से विकासकडे कसे जाणार आहेत. देशभरात 103 उमेदवार विरासत वालेच आहेत, असे म्हणत आधीचे संकल्प पूर्ण का नाही केले?" असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Devendra Fadnavis-Sushma Andhare
Dr. Babasaheb Ambedkar: डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि निळ्या रंगाचे नाते काय?

सुप्रिया सुळेंचेही टीकास्त्र..

"मुंबईत भररस्त्यावर गोळीबार होत असेल तर ही बाब गंभीर आहे. अब की बार गोळीबार सरकार अस मी नेहमी म्हणते. त्यावर आणखी एक शिक्कामोर्तब झाला आहे. महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारमधील नेत्यांचा गुन्हेगारीला आशीर्वाद आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे. हे गृहमंत्र्याच अपयश आहे," असे म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

Devendra Fadnavis-Sushma Andhare
Sambhajinagar News : अश्लील व्हिडीओ पाहिल्याचे सांगत सायबर गुन्हेगाराकडून ब्लॅकमेलिंग; शेकडो जणांना मेलद्वारे धमकी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com