Shocking News : धक्कादायक! शिक्षक रागावल्यानं दहावीच्या २ विद्यार्थिनींनी संपवलं आयुष्य, हैदराबादमधील घटना

Hyderabad Crime News: हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शिक्षक रागवल्यामुळे दोन दहावीच्या विद्यार्थीनींनी गळफास घेत आयुष्य संपवलं आहे.
Hyderabad News
Hyderabad NewsSaam Tv
Published On

10th Class Girls End Life

तेलंगणातील हैदराबादमध्ये (Hyderabad) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे दोन मुलींनी सरकारी वसतिगृहात आत्महत्या केली आहे. हे वसतिगृह तेलंगणा सरकार अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी चालवत आहे. या विद्यार्थीनींनी असं टोकाचं पाऊल का उचललं, ते आपण जाणून घेऊ या. (Latest Crime News)

शिक्षक रागवल्यामुळं दहावीच्या दोन मुलींनी वसतिगृहात जाऊन गळफास घेत जीवन संपवलं आहे. त्यांच्या घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली (10th Class Girls End Life) होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळी पाहणी केली. यावेळी घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घटनास्थळी सुसाईड नोट सापडली

घटनेची माहिती मिळताच पोलीस वसतिगृहात पोहोचले. त्यांनी घटनास्थळी चौकशी केली. तेव्हा त्यांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोट (Hyderabad Crime) सापडली. यामध्ये विद्यार्थिनींनी आपल्यावर खोटा आरोप केल्याचं सांगितलं आहे.

आम्ही काही चूक नसतानाही या प्रकरणात अडकलो आहोत. नोटमध्ये त्यांनी कुणावरही आरोप केले नाही. या चिठ्ठीत पुढे लिहिलं होतं की, आमच्यावर कोणीही विश्वास ठेवत (Hyderabad News) नाही. आम्ही न केलेल्या गोष्टीसाठी आम्ही अडकलो जात आहे. याचा सामना करण्यास आम्ही असमर्थ आहोत, त्यामुळे आम्ही आत्महत्या करत आहोत. आमचे अंतिम संस्कार एकत्र पार पाडा, असं त्यांनी नोटमध्ये म्हटलं आहे.

Hyderabad News
Sridevi Death Case : श्रीदेवी मृत्यू प्रकरणात PM मोदींच्या बनावट पत्राचा हवाला, सीबीआयने स्वयंघोषित गुप्तहेराविरोधात उचलले मोठे पाऊल

पोलीस तपास सुरू

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या चिठ्ठीत दोघींनीही निर्दोष असल्याचा दावा (Girls End Life In Hostel) केलाय. केवळ त्यांची वॉर्डन शैलजा यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दुर्दैवाने जिल्हा वॉर्डन आणि गटविकास अधिकारी यांच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचलं नव्हतं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

याप्रकरणी जिल्हा शिक्षणाधिकारी नारायण रेड्डी यांनी सांगितलं की, कनिष्ठ वर्गातील विद्यार्थ्यांनी या दोन्ही विद्यार्थिनींविरोधात तक्रार केली होती. हा एक छोटासा मुद्दा होता. यानंतर वॉर्डनने त्यांना समजावून (Crime News) सांगितलं. पण या घटनेमुळे मुली अधिकच नाराज झाल्या आणि त्यांनी टोकाचं पाऊल उचललं.

Hyderabad News
Indian Student Killed In America: आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत हत्या, आठवड्यात तीन विद्यार्थ्यांनी गमावला जीव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com