
हिंगोली : हिंगोलीच्या औंढा बसस्थानक परिसरात सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. काल सायंकाळी औंढा बस स्थानकाच्या मागे जंगलात एका महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळला होता. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. मात्र, पोलिसांनी २४ तासाच्या आत या महिलेची ओळख पटवली असून औंढा तालुक्यातील पिंपळदरी गावातील ही महिला असून तिचं नाव स्वाती सतीश भगत आहे. दरम्यान, तीन तारखेला सासरवाडीमधील मंडळींसोबत वाद झाल्यानं रागाच्या भरात या महिलेनं आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी औंढा पोलीस स्थानकात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पुण्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या
दरम्यान, पुण्यात काल एक धक्कादायक घटना समोर आली. पुण्यातील पिंपरी चिंचवडच्या रस्त्यावर मध्यरात्री तरूणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वालेकर वाडी येथे १८ वर्षांच्या तरूची धारधार शस्त्राने सपासप वार करत हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रसंगाचा सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांच्या हाती लागलाय. या प्रकरणी पोलिसांनी मामा भाच्याला दोघांना ताब्यात घेतलं आहे. कोमल भरत जाधव (वय १८) असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे. उदयभान यादव (वय ४५) आणि त्याचा सख्खा भाचा या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. उदयभान यादव हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हत्या झालेली तरुणी कोमल जाधव ही पिंपरी चिंचवड परिसरातील वाल्हेकरवाडी परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होती. रविवारी कोमल जाधव घरामध्ये होती. यादव हा तिच्याच शेजारी वास्तव्यास होता. त्या दोघांमध्ये आर्थिक व्यवहारातून वाद झाले होते. त्यामुळे उदयभान याने कोमल हिला संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याने आपल्या भाच्याच्या मदतीने रविवारी रात्री दुचाकीवरून डोक्यात हेल्मेट घालून कोमलला घराच्या बाहेर बोलावून घेतलं. कोमल घराच्या खाली आली, त्यानंतर तिच्यावर शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात कोमलचा जागीच मृत्यू झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.