Crime: अल्पवयीन मुलीचं मार्केटमधून अपहरण, कारमध्ये सामूहिक बलात्कार; १० तास ओलिस ठेवलं नंतर...

Haryana Crime: हरियाणाच्या फरिदाबादमध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर कारमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडित मुलीला आरोपींनी १० तास ओलिस ठेवलं होतं. त्यानंतर ती कशी तरी आरोपींच्या तावडीतून सुटली.
Crime: अल्पवयीन मुलीचं मार्केटमधून अपहरण, कारमध्ये सामूहिक बलात्कार; १० तास ओलिस ठेवलं नंतर...
Haryana Crime Saam Tv
Published On

हरियाणाच्या फरिदाबादमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मार्केटमधून पीडित मुलीचं अपरहण करण्यात आले. १० तास तिला ओलिस ठेवत तिच्यावर कारमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. ही घटना फरिदाबादच्या जुनं पोलिस ठाण्याच्या परिसरातील एका कॉलनीमध्ये घडली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी अल्पवयीन मुलगी सेक्टर-१८ मधील एका दुकानात मोमोज खरेदी करण्यासाठी गेली होती. त्याठिकाणावरून जाणाऱ्या कारमधील चार तरुणांनी तिचे अपहरण केले. नंतर तिला एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. जवळपास १० तास आरोपींनी पीडित मुलीला ओलीस ठेवलं. त्यानंतर पीडित मुलीने कसा तरी तेथून पळ काढला.

Crime: अल्पवयीन मुलीचं मार्केटमधून अपहरण, कारमध्ये सामूहिक बलात्कार; १० तास ओलिस ठेवलं नंतर...
Crime: भयंकर! शेतावर गेलेल्या वृद्ध महिलेवर सामूहिक बलात्कार, नंतर दगडाने ठेचून हत्या; भिवंडी हादरले

पीडित मुलगी पहाटे चार वाजता तिच्या घरी पोहोचली. पीडितेने तिच्यासोबत घडलेला प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. तिला गुंगीचे औषध मिसळलेले कोल्ड्रिंक देण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी अद्याप पीडितेचा जबाब नोंदवलेला नाही. या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत पण त्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला.

Crime: अल्पवयीन मुलीचं मार्केटमधून अपहरण, कारमध्ये सामूहिक बलात्कार; १० तास ओलिस ठेवलं नंतर...
Crime News: रिल पाहताना सुचली मर्डरची आयडीया, कानातले गहाण ठेवून दिली सुपारी, मेहुणीनेच काढला दाजींचा काटा

पीडित मुलीचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशचे आहे. ते जुने पोलिस स्टेशन परिसरातील एका कॉलनीत राहतात. तिचे वडील एका कंपनीत नोकरी करतात. पीडित मुलगी एका सरकारी शाळेत आठवीमध्ये शिकते. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ती रविवारी संध्याकाळी ७ वाजता सेक्टर १८ मध्ये मोमोज खाण्यासाठी घराबाहेर पडली होती. बराच वेळ ती परत न आल्याने तिचे कुटुंब चिंतेत पडले. त्यांनी ओळखीच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांकडे चौकशी केली. परंतु तिचा कोणताही पत्ता लागला नाही.

Crime: अल्पवयीन मुलीचं मार्केटमधून अपहरण, कारमध्ये सामूहिक बलात्कार; १० तास ओलिस ठेवलं नंतर...
Crime News : आई की कसाई? बॉयफ्रेंडसाठी एकुलत्या एक मुलाची हत्या, परिसरात खळबळ

पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा सगळीकडे शोध घेतला पण ती सापडली नाही. त्यामुळे ते प्रचंड चिंतेत होते. शेवटी पहाटे ४ वाजता मुलगी घरी आली. तिची अवस्था पाहून कुटुंबीय प्रचंड घाबरले. तिच्यासोबत सामूहिक बलात्कार झाल्याचे ऐकून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. पीडित मुलगी सध्या काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही. आरोपींनी तिला कुणालाही काहीही सांगितले तर कुटुंबाला जीवे मारून टाकू अशी धमकी दिली होती. पोलिस सध्या मार्केट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

Crime: अल्पवयीन मुलीचं मार्केटमधून अपहरण, कारमध्ये सामूहिक बलात्कार; १० तास ओलिस ठेवलं नंतर...
Mumbai Crime : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; बीएमसी अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com