Crime News: हुंड्यासाठी पतीने गर्भवती पत्नी आणि सासूला संपवलं, सिलेंडरचा स्फोट घडवला

Crime: गोव्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय नौदलातील एका कर्मचाऱ्याने त्याची पत्नी आणि सासूची हत्या केली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Crime News
Crime NewsSAAM TV
Published On

Goa Crime News

गोव्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय नौदलातील एका कर्मचाऱ्याने त्याची पत्नी आणि सासूची हत्या केली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. अनुराग सिंग राजावत असे आरोपीचे नाव आहे. (Latest News)

आरोपी अनुरागने आपली गर्भवती पत्नी शिवानी राजावत (२६) आणि सासू जयदेवी चौहान (५०) यांची हत्या केली आहे. गेल्या वर्षी १८ नोव्हेंबरला त्याच्या घरात गॅसचा स्फोट झाल्याने या दोघींचा मृत्यू झाला होता. मात्र, आता या दोघींची हत्या झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणात अनुराग सिंग राजावतला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली आहे. अनुराग हुंड्यासाठी शिवानी आणि तिच्या कुटुंबियांना त्रास देत होता. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने तपास केला त्यावेळी अनुराग सिंग राजावत आरोपी असल्याचे समजले. स्फोटाच्या वेळी शिवानी आणि तिची आई घरातच होती. गोव्यातील वास्को द गामा शहरातील न्यू वडदेम येथे हा प्रकार घडला आहे. स्वयंपाकघरातील गॅस गळतीमुळे त्यांचा मृत्यू झाला.

Crime News
Sharad Mohol latest news : कुख्यात गुंड शरद मोहोळचे मारेकरी कोण? आरोपींची नावं आली समोर

गॅस गळती रात्रभर झाल्याने स्फोट झाला असावा, असं पोलिसांनी सांगितले आहे. सकाळी जेव्ही महिलेने गॅस पेटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा गॅसचा स्फोट झाला. स्फोट इतका तीव्र होता की, ज्यामुळे घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. यात त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी शिवानीच्या भावाने सांगितले की, अनुराग सिंगने २० लाख रुपयांचा हुंडा मागितला होता. तो पत्नीचा छळ करायचा. त्यामुळेच त्याने या दोघींची हत्या केली असावी. याप्रकरणी उपविभागीय दंडाधिकारी यांनी तपास सुरू केला. अनुराग सिंग राजावतवर हुंडाबळी आणि छळ केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
CCTV Footage : कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येची घटना सीसीटीव्हीत कैद, VIDEO आला समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com