Salman Khan
Salman Khan Saam Tv

Salman Khan News: अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; आरोपींनी वाहन बदलल्याचं तपासात उघड

Firing At Salman Khan Bandra House: अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणामध्ये मोठी अपडेट आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

सचिन गाड साम टीव्ही, मुंबई

अभिनेता सलमान खानच्या (Bollywood Actor Salman Khan) घरावर गोळीबार प्रकरणामध्ये मोठी अपडेट आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. आता गुन्हे शाखा सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास करणार आहे. गुन्हे शाखेची मुंबईतील युनिट तसेच खंडणी विरोधी पथक आणि सीआययु तपास (Crime Branch) करता आहेत.

अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोरांनी क्षणाक्षणाला आपलं वाहन बदलल्याचं तपासात उघड झालं आहे. हल्ला करताना वापरलेली बाईक हल्लेखोरांनी माऊंट मेरी चर्चजवळ सोडली. त्यांनी तिथून एक (Firing AT Salman Khan Bandra House) रिक्षा पकडली. रिक्षाने हल्लेखोर वांद्रे रेल्वे स्थानकात आले, जिथे पुन्हा एकदा दोघे हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाले आहेत. वांद्रे स्थानकातून ट्रेनने हे दोघे सांताक्रुजला आले. सांताक्रुझवरून त्यांनी पुन्हा रिक्षा केली आणि वाकोल्याला उतरले. तिथून पुढे हे हल्लेखोर नेमके कुठे गेले, हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाहीये.

सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर आरोपींनी सलग ४ राऊंड फायर केले होते. व्हिडीओमध्ये दिसतंय की, दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. त्यानंतर ते घटनास्थळावरून फरार झाले होते. गोळीबार करणाऱ्या दोन्ही व्यक्तींनी हेल्मेट घातलेलं होतं. ते दोघेही गोळीबार केल्यानंतर मुंबईच्या दिशेने पसार झाले होते. या गोळीबारामध्ये कोणीही जखमी झालेले नसल्याची माहिती मिळतेय.

याप्रकरणात पोलीस चांगलेच अॅक्टिव्ह मोडवर आले आहेत. आता या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा गोळीबार तेव्हा सलमान खान (Salman Khan News) त्याच्या घरीच होता. गोळीबाराची घटना घडल्यानंतर पोलिसांनी सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली आहे.

Salman Khan
Salman Khan Galaxy Apt Firing: 'सलमान खान यह तो ट्रेलर है...'; अनमोल बिश्नोईने घेतली जबाबदारी, फेसबुक Post Viral

कोणत्याही अज्ञात व्यक्तीला सलमान खानच्या घराच्या परिसरात येण्यापासून मज्जाव करण्यात आलाय. याअगोदर देखील सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. (Firing AT Salman Khan House) लॉरेन्स बिष्णोई गँगने काही दिवसांपूर्वी सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. ख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने एका टेलिव्हिजन मुलाखतीमध्ये सलमान खानला मारणे, हेच उद्दिष्ट असल्याचं सांगितलं होतं.

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रेतील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. १४ एप्रिल रोजी पहाटे दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी सलमान खानच्या घराबाहेर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आहे. सलमान खानच्या घराबाहेर अंदाधुंद गोळीबार झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली (Salman Khan Bandra House) आहे.

Salman Khan
Salman Khan Galaxy Apt Firing: भाईजानच्या जिवाला धोका; बिश्नोई गँगच्या रडारवर सलमान खान? काय आहे प्रकरण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com