प्रायव्हेट पार्टला स्पर्श, अश्लील मेसेज, IPS अधिकाऱ्यावर महिला अधिकाऱ्याचे गंभीर आरोप; पोलीस दलात खळबळ

Female IPS Trainee Harassment Case Hyderabad SVPNPA: हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये महिला प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्याने सहकारी अधिकाऱ्यावर लैंगिक छळ, मारहाण आणि ब्लॅकमेलचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Female IPS trainee files serious harassment complaint against batchmate at Hyderabad Police Academy
Female IPS trainee files serious harassment complaint against batchmate at Hyderabad Police Academysaam tv
Published On

हैदराबादमधील सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये एका महिला प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्याने आपल्या बॅचमधील सहकारी अधिकारी कृष्ण रेड्डी यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी उदय कृष्ण रेड्डी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. कॉन्स्टेबल ते आयपीएस अधिकारी असा करियरचा प्रवास असलेले उदय कृष्ण रेड्डी आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. हैद्राबादमधील अकॅडमीतील एका महिला प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याने तक्रार करत आरोप केला आहे की, रेड्डी यांनी सुमारे तीन आठवड्यांपर्यंत तिचा वारंवार लैंगिक छळ केला, मारहाण केली आणि ब्लॅकमेल केले.

30 वर्षीय महिला अधिकाऱ्याने 18 जुलै रोजी दिलेल्या तक्रारीत नमूद केले केले आहे की, 23 जून ते 10 जुलै दरम्यान प्रशिक्षणावेळी उदय कृष्ण रेड्डी यांनी तिला त्रास दिला. त्यांनी अश्लील मेसेज पाठवले, धमक्या दिल्या आणि तिचा खाजगी व्हिडिओ रेकॉर्ड करून तिच्या पतीला पाठवल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी हैद्राबाद सिटी पोलिसांच्या अट्टापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यांनुसार, आरोपीने सोशलमीडियाद्वारे अश्लील मेसेज पाठवून छळ सुरू केला, तसेच इतर लोकांसमोर तिचा अपमान केला आणि खोटे आरोपही केले.

Female IPS trainee files serious harassment complaint against batchmate at Hyderabad Police Academy
Kalyan Crime: कल्याण हादरले! डोक्यावर वार करत तरुणीने बॉयफ्रेंडला संपवलं, मृतदेह गोणीत भरून २४ तास पाण्यात ठेवला

महिला अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, आरोपीने तिला धमकावून तिचे वैयक्तिक मेसेज दाखवण्यास भाग पाडले. तिचा मोबाईल हिसकावून पासवर्ड सांगायला लावला. तसेच खाजगी व्हिडिओ रेकॉर्ड करून तो तिच्या नवऱ्याला पाठवू ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, ९ जुलै रोजी आरोपीने तिला जबरदस्तीने खोलीत नेले, तिचे केस ओढले, गळा दाबण्याचा प्रयत्न केला आणि चाकू दाखवून बाहेर जाऊ दिले नाही. त्यानंतर १० जुलैलाही तिच्यावर मारहाण केल्याचा आरोप आहे. ८ जुलै रोजी तिला नको तिथे स्पर्श केल्याचाही उल्लेख तक्रारीत आहे.

Female IPS trainee files serious harassment complaint against batchmate at Hyderabad Police Academy
VIRAL VIDEO : डोळ्यांदेखत मगरीनं त्या मुलाला नदीत खेचलं अन्...काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल, बघून हादराल!

कोण आहे IPS अधिकारी कृष्ण रेड्डी?

उदय कृष्ण रेड्डी यांचा जन्म प्रकाशम जिल्ह्यातील सिंगरायकोंडा मंडलातील उल्लापालेम गावात झाला. ते लहान असतानाच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. त्यांचे संगोपन आजी रमणम्मा यांनी केले. आर्थिक अडचणींवर मात करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. शिक्षणादरम्यान त्यांनी लॅब टेक्निशियन म्हणूनही काम केले. २०१२ मध्ये ते कॉन्स्टेबल म्हणून पोलिस दलात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी नोकरी सोडून यूपीएससीची UPSC तयारी सुरू केली. २०१९, २०२१ आणि २०२२ मध्ये अपयश आल्यानंतर त्यांनी २०२३ मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. २०२४ मध्ये त्यांनी ऑल इंडिया रँक ३५० मिळवत आयपीएस पदाला गवसणी घातली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com