Dhule Horror : बाप आहे की हैवान.. आईच्या डोळ्यासमोर दीड वर्षाच्या मुलाचा जीव घेतला, नंतर....

Dhule crime news : धुळे जिल्ह्यातील रामी गावात दारूच्या नशेत सावत्र बापाने दीड वर्षाच्या कार्तिकचा खून केला. आईच्या डोळ्यासमोर घडलेल्या या घटनेनंतर मुलाचा मृतदेह शेतात पुरला. पोलिसांनी आई-वडील दोघांना अटक केली आहे.
Crime News
Crime NewsSaam tv
Published On

Stepfather kills toddler, Maharashtra child murder : धुळे जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. सावत्र बापाने दारूच्या नशेत दीड वर्षाच्या लेकाचा जीव घेतला. नराधम बापाने दीड वर्षाच्या मुलाला जमिनीवर जोरात आपटलं, त्यामुळे चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर धुळ्यात एकच खळबळ उडाली आहे. नराधम बापाने आईच्या डोळ्यासमोरच लेकाची हत्या केली. त्यानंतर मृतदेह शेतात पुरला. याप्रकरणी पोलिसांनी आई-बाप दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. सावत्र बापाचे नाव पंकज बागुल असे आहे.

सावत्र बाप पंकज बागुल याने दारूच्या नशेत अवघ्या दीड वर्षाच्या मुलगा कार्तिकचा जमिनीवर आपटून जीव घेतल्याची घटना धुळे तालुक्यातील रामी गावात घडली आहे. विशेष म्हणजे ही घटना मुलाच्या जन्मदात्या आई सुरेखा बापू सोनवणेच्या डोळ्यादेखत घडली. तब्बल १२ दिवसानंतर शनिवारी दुपारी जेव्हा पोलिसांनी शिवारातील एका शेतातून मृतदेह उकरून काढल्याने ही घटना उजेडात आली. याप्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला, पोलिसांनी सावत्र बापासह जन्मदात्या आईला अटक केली आहे,

Crime News
Nashik Crime : धक्कादायक! नाशिकमध्ये रिल्सस्टारला मारण्याचा कट, ८ लाख फॉलोअर्स पाहून नियत फिरली अन्...

सुरेखा बापू सोनवणे या महिलेचा पती हा मध्यप्रदेशात असून त्याच्याशी जमत नसल्याने ती आपल्या दीड वर्षाचा कार्तिकसोबत रामी गावात राहत होती, लामकानी गावातील रहिवासी पंकज बापू बागुल याचे सुरेखाशी प्रेमसंबंध जुळले, त्यानंतर सुरेखा मुलगा कार्तिक आणि पंकज बागुल हे तिघे सागर गुलाब गिरासे यांचे शेतात कामानिमित्त गेल्या चार महिन्यापासून राहत होते. सावत्र बाप पंकजने दारूच्या नशेत जन्मदात्या आईसमोरच दीड वर्षाच्या कार्तिकला जमिनीवर आपटून ठार मारले. नंतर कार्तिकचा मृतदेह बाजूच्या शेतात पुरला. बेपत्ता कार्तिकचा शोध सोनगीर पोलिसांनी सुरु केला आणि शेतातून त्याचा मृतदेह ऊकरून काढला, त्यानंतर सावत्र बाप व आईला सोनगीर पोलिसांनी अटक केली आहे.

Crime News
Pune Drunk Driver : दारूच्या नशेत सदाशिव पेठमध्ये १२ जणांना उडवले, चालकासह मालकाला बेड्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com