BJP Leader Death: खळबळजनक! भाजप नेत्याचा रेल्वे रुळावर आढळला मृतदेह; अपघात की घातपात? तपास सुरु

Chhattisgarh BJP Leader Death: शेखर चंदेल हे माजी विरोधी पक्षनेते नारायण चंदेल यांचे धाकटे भाऊ असून राजकारणात सक्रिय होते. चंदेल यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात असून याबाबत अधिक तपास सध्या सुरु आहे.
BJP Leader Death: खळबळजनक! भाजप नेत्याचा रेल्वे रुळावर आढळला मृतदेह; अपघात की घातपात? तपास सुरु
Chhattisgarh BJP Leader Death:Saamtv
Published On

BJP Leader Found Dead: रेल्वे स्थानकाजवळ भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. छत्तीसगडच्या नाइला रेल्वे स्थानकाजवळ भाजप नेते शेखर चंदेल यांचा मृतदेह आढळ्यानंतर हे प्रकरण समोर आले. शेखर चंदेल हे माजी विरोधी पक्षनेते नारायण चंदेल यांचे धाकटे भाऊ असून राजकारणात सक्रिय होते. चंदेल यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात असून याबाबत अधिक तपास सध्या सुरु आहे.

BJP Leader Death: खळबळजनक! भाजप नेत्याचा रेल्वे रुळावर आढळला मृतदेह; अपघात की घातपात? तपास सुरु
Maharashtra Politics : महाराष्ट्रात गुजरात पॅटर्न लागू होणार? भाजप आमदारांना धडकी; अनेकांची झोपच उडाली

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शुक्रवार (ता. २७ सप्टेंबर) रोजी छत्तीसगडच्या नाइला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि नाइला केबिन दरम्यान अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. स्थानिकांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. हा मृतदेह नाइला येथील भाजप नेते शेखर चंदेल यांचा असल्याचे तपासात समोर आलं आहे. शेखर चंदेल हे माजी विरोधी पक्षनेते नारायण चंदेल यांचे धाकटे भाऊ असून राजकारणात सक्रिय होते.

शेखर चंदेल यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. शेखर चंदेल रात्री 8.30 वाजता आपल्या राईस मिलमधून पायी निघाले होते, असे सांगण्यात येत आहे. मोबाईलवर बोलत बोलत ते जात होते. याचवेळी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळल्याची दिल्याची माहिती मिळाली. त्यांनी घातेलेल्या शर्टावरुन त्यांची ओळख पटवण्यात यश आले आहे. मात्र ही हत्या आहे की आत्महत्या? याबाबतचा अधिक तपास सुरु आहे.

BJP Leader Death: खळबळजनक! भाजप नेत्याचा रेल्वे रुळावर आढळला मृतदेह; अपघात की घातपात? तपास सुरु
Crime News : बेपत्ता १६ वर्षीय शाळकरी मुलाची गळफास घेऊन आत्महत्या, कुटुंबियांचा पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या, गंभीर आरोप!

दुसरीकडे या भाजप नेत्याने आत्महत्या केल्याचाही दावा केला जात आहे. घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी अथवा दंशे मिळाला नसून पोलीस या अँगलनेही तपास करत आहेत. पोलीस सध्या कुटुंबीयांची चौकशी करून आत्महत्येचे कारण शोधण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे शेखर चंदेल यांची नुकतीच स्काऊट गाईडचे जिल्हा आयुक्त बनवण्यात आले होते.

BJP Leader Death: खळबळजनक! भाजप नेत्याचा रेल्वे रुळावर आढळला मृतदेह; अपघात की घातपात? तपास सुरु
Pune Porsche Accident: ‘पोर्शे' अपघातातील अल्पवयीन मुलाला कॉलेजमध्ये प्रवेश मिळेना; दिल्लीतील संस्थेने ॲडमिशन रद्द केलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com