
संजय जाधव , साम प्रतिनिधी
जळगावमधील जामोदचे भाजप आमदार संजय कुटे याचे कार चालक पंकज देशमुख मृत्यू प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. पंकज देशमुख मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांचा हात असल्याची बाब समोर आलीय. मृत पंकज देशमुख यांच्या पत्नीने या प्रकरणातील तीन संशयितांची नावे पोलीस अधिक्षकांना दिली आहेत. त्याचबरोबर आरोपींना मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे सुद्धा त्यांनी पोलीस अधीक्षकांना दिली आहेत. भाजप कार्यकर्त्यांकडे आपल्याला धमक्या येत असल्याची तक्रारही त्यांनी अधीक्षकांकडे केलीय.
कार चालक पंकज देशमुख हे आमदार संजय कुटे यांचे निकटवर्तीय होते. पंकज देशमुख यांचा ३ मे रोजी संशयास्पद मृतदेह सापडला होता. पंकज देशमुख यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी केली जावी, अशी मागणी सुनीता देशमुख यांनी लावून धरली. त्यापार्श्वभूमीवर सुनीता देशमुख यांनी बुलढाणा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची भेट घेतली.
त्यांनी या प्रकरणातील तीन संशयतांची नावे दिली आहेत. तसेच या प्रकरणात संशयितांना मदत करणाऱ्या तीन पोलीस अधिकाऱ्यांची नावेही पोलीस अधीक्षकांकडे त्यांनी दिली आहेत. आज सुनीता देशमुख यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोरही पंकज देशमुख यांची हत्या करणाऱ्या संशयितांची नावे आणि त्यांना मदत करणाऱ्या तीन पोलीस अधिकाऱ्यांची नावे उघड केली.
यावेळी त्यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलतांना देशमुख मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा केलाय. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा धक्कादायक खुलासा सुनिता देशमुख यांनी केलाय. भाजप कार्यकर्त्यांकडून आपल्याला धमक्या येत आहेत,असा आरोप त्यांनी यावेळी केला. आपलं आणि आपल्या मुलांचं बरं वाईट झाले तर सरकार जवाबदार राहील. जर आपल्याला लवकर न्याय मिळाला नाहीतर आपण उपोषण करू, असा अल्टीमेटमही त्यांनी सरकारला दिलाय.
पंकज देशमुख यांचा ०३ मे रोजी संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला होता. मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी परस्पर मृतदेहाचं पोस्टमार्टम केलं होतं. त्यासाठी कुटंबियांना विश्वासात घेतलं नव्हतं. आता संशयितांची नावे पोलीस अधीक्षकांकडे देण्यात आली आहेत. याप्रकरणात पोलिसांचीही नावे समोर आली आहेत. त्यामुळे पोलीस अधीक्षक यावर काय कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं असेल.
पंकज देशमुख मृत्यू प्रकरणात पोलिसांचाही हात असल्याची माहिती उघड होताच जिल्ह्यात खळबळ उडालीय. पोलिसांचे नाव यात येत असल्यानं या प्रकरणाला वेगळं वळण लागल्याची शक्यता आहे. पंकज देशमुख यांचा घातपात करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केलाय. त्याचमुळे पंकज देशमुख मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत करण्यात यावा, अशी मागणी मृत पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनिता देशमुख यांनी केलीय.
दरम्यान पोलिसांनी पंकज देशमुख यांच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम अकोला येथील रुग्णालयात केलं. मात्र पोलिसांनी पोस्टमार्टम करताना कुटुंबियांना विश्वासात घेतलं नव्हतं. दरम्यान पंकज देशमुख यांचा मृत्यू हा आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय देशमुख यांच्या कुटु्ंबियांना आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.