Beed Crime News
Beed Crime NewsSaam tv

Beed Crime: बंदुकीचा धाक दाखवून कॅशियरला लुटले; मुख्य आरोपी अटकेत, ९ लाख रुपये जप्त

Beed News: बीडच्या अंबाजोगाई शहरात पतसंस्थेच्या कॅशियरला रस्त्यात अडवून बंदुकीचा धाग दाखवून 39 लाख रुपये लुटले होते. या प्रकरणी पोलिसांकडून टोळीच्या म्होरक्याला अटक करण्यात आली आहे.
Published on

Beed Crime News:

बीडच्या अंबाजोगाई शहरात पतसंस्थेच्या कॅशियरला रस्त्यात अडवून बंदुकीचा धाग दाखवून 39 लाख रुपये लुटले होते. या प्रकरणी पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई केली असून टोळीच्या म्होरक्याला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्याकडून 9 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

बीडच्या (Beed) अंबाजोगाई शहरात राजश्री शाहू नागरी सहकारी पतसंस्थेच्या कॅशियरला रस्त्यात अडवून बंदुकीचा धाग दाखवून 39 लाख रुपये लुटल्याची घटना घडली होती. या धाडसी चोरीचा बीड पोलिसांनी पर्दाफाश केला असून याप्रकणी मुख्य आरोपीस अटक करण्यात आले आहे. नारायण शाहूराव जोगदंड असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 9 लाख रुपयाची रक्कम जप्त करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्हीचा आधार घेऊन एकाला बेड्या ठोकल्या असून त्याच्या 3 साथीदारांचा शोध सुरू आहे. 16 फेब्रुवारी 2024 रोजी गणेश देशमुख व योगेश लोभेकर हे पतसंस्थेची दिवसभर जमा झालेली 39 लाख 16 हजार 160 रूपयांची रोकड घेऊन दुचाकीवरून बँक मॅनेजरकडे जात होते.

Beed Crime News
Dhule News : पाण्याचा शोध आला जिवाशी; हंड्यात अडकलं बिबट्याचं मुंडकं, वन विभागाने दिलं जीवनदान

अंबाजोगाई शहरातील मुकुंदराज कॉलनीजवळ पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांना अडवत बंदुकीचा धाक दाखवून ही रोकड लुटली होती. दरम्यान याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आधार घेत आरोपी नारायण जोगदंड याला ताब्यात घेतले आहे. (Latest Marathi News)

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Beed Crime News
विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, तीन युवकांना 20 वर्षे सश्रम कारावास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com