Seema Haider : सीमा हैदरच्या मुलांना पाकिस्तानात पाठवणार आणि तिला तुरुंगात; कुणी दिला इशारा?

Seema Haider Latest News in marathi : सीमा हैदरबाबत नवीन वृत्त हाती आलं आहे. पाकिस्तानी नागरिक गुलाम हैदरच्या वकिल मोमिन मलिक यांनी सीमा हैदरला मोठा इशारा दिला आहे.
Seema Haider News Update
Seema Haider News UpdateSaam Tv
Published On

Seema Haider Latest News:

सीमा हैदरबाबत नवीन वृत्त हाती आलं आहे. पाकिस्तानी नागरिक गुलाम हैदरच्या वकील मोमिन मलिक यांनी सीमा हैदरला मोठा इशारा दिला आहे. सीमा हैदरला ५ वर्षांसाठी तुरुंगात पाठवाणार असल्याचा इशारा वकील मोमिन मलिकने दिला आहे. मोमिन मलिक हे हरियाणातील पानीपत येथे राहणारे आहेत. (Latest Marathi News)

मोमिन मलिक यांनी काय म्हटलं?

वकील मोमिन मलिक यांनी म्हटलं की, 'सीमा हैदरला लवकरच पाच वर्षांची शिक्षा होईल. सीमाने घटस्फोट न घेता सचिनसोबत लग्न केलं. या प्रकारे लग्न करणं बेकायदेशीर आहे. सीमाच्या मुलांची कस्टडी वडील गुलाम हैदरला मिळवून देऊ. सीमा आणि गुलाम हैदरच्या मुलांवर वडिलांचा अधिकार आहे. यामुळे मुलांची कस्टडी वडिलांना मिळाली पाहिजे'.

Seema Haider News Update
Seema Haider YouTube Income: पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर व्हिडीओतून किती पैसे कमावते? जाणून घ्या

सचिनवर केले गंभीर आरोप

गुलाम हैदरचे वकील मोमिन मलिक यांनी म्हटलं की, 'सीमा आणि सचिनने काही करावं. पण मुलांचं बळजबरीने धर्मांतर का केलं? तिच्या मुलांना याबाबत कशाचीही माहिती नाही'.

सीमा हैदरची सोशल मीडियावर बक्कळ कमाई

सोशल मीडियावरून सीमा हैदर बक्कळ कमाई करत आहेत. यावर मोमिन मलिक यांनी म्हटलं की, 'सीमा बेकायदेशीर मार्गाने कमाई करत आहे. सीमा हैदर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. या माध्यमातून चांगली कमाई करत आहे. तिची कमाई बेकायदेशीर आहे. तिची कमाई लवकरच बंद करणार आहे'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Seema Haider News Update
Bhabiji Ghar Par Hai: 'भाबीजी घर पर हैं' मालिकेतील अभिनेत्री लवकरच आई होणार; Bold Photoshoot करत दिली गुडन्यूज

पबजीमुळे सचिन आणि सीमाची झाली भेट

पाकिस्तानी सीमा हैदरने चार मुलांसोबत नेपाळ मार्गे भारतात आली होती. त्यानंतर सीमा आणि सचिनची नेपाळमध्ये भेट झाली. त्यानंतर नेपाळमधील मंदिरात जाऊन त्यांनी लग्न केलं. पबजी गेममुळे दोघे एकमेकांच्या संपर्कात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com