Dhule News : पाण्याचा शोध आला जिवाशी; हंड्यात अडकलं बिबट्याचं मुंडकं, वन विभागाने दिलं जीवनदान

Leopard : पाण्याच्या शोधात असलेला बिबट्या शेतकऱ्याच्या पडवीत पोहोचला.तहानलेला बिबट्या हंड्यातील पाण्याचा प्रयत्न करू लागला. पण या प्रयत्नात त्याचे मुंडके हंड्यात अडकलं. वन विभागाच्या प्रयत्नामुळे बिबट्याला जीवनदान मिळाले आहे.
Sakri Leopard
Sakri LeopardSaam Tv
Published On

(भूषण अहिरे, धुळे)

Leopard Head Stuck In Water Pot :

उन्हाच्या झळा आता जाणवू लागल्या असून उन्हाचा फटका वन्य प्राण्यांनाही बसत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी प्राण्यांना भटकंती करावी लागत आहे. पाण्याचा शोध वन प्राण्यांच्या जीवाशी येत आहे. पाण्याच्या शोधात असलेल्या एका बिबट्याचं मुंडकं हंड्यात अडकलं. वन विभागाच्या पथकाला याची माहिती झाल्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन करत करत बिबट्याला सुटका केलीय. ही घटना साक्री तालुक्यातील घोगशेवड गावात घडली.(Latest News)

पाण्याच्या शोधात असलेला बिबट्या शेतकऱ्याच्या पडवीत पोहोचला. तहानलेला बिबट्या हंड्यातील पाण्याचा प्रयत्न करू लागला. पण या प्रयत्नात त्याचे मुंडके हंड्यात अडकलं. मुंडकं अडकल्याने बिबट्या श्वास घेण्यासाठी धडपडू लागला. ही बाब शेतकऱ्याला निदर्शनास येताच शेतकऱ्यांने तात्काळ वन विभागाच्या पथकाला याची माहिती दिली. शेतकऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वन विभागाने बिबट्याच्या शेपटीला बेशुद्धीचे इंजेक्शन दिलं. बिबट्या शुद्ध हरपल्यानंतर वन विभागाने कटरच्या सहाय्याने तांब्याचा हंडा कापला. त्यानंतर बिबट्याला ऑक्सिजन मिळू लागला. दरम्यान पथकाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याचं मुंडकं बाहेर काढत जीवनदान दिलं. त्यानंतर बिबट्याला जेरबंद करत बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं.

लोणीत सहावा बिबट्या जेरबंद

अहमदनगर जिल्ह्यातील लोणी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात दोन लहान मुलांना आपला जीव गमवावा लागला होता. बिबट्याला पकडण्यासाठी लोणी परिसरात जवळपास १८ पिंजरे लावण्यात आले होते. त्यापैकी ब्राह्मणे वस्तीवरील एका पिंज-यात बिबट्या जेरबंद झाला.

Sakri Leopard
Leopard Captured : नवले मळा येथे धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com