Parbhani Crime News : जिंतूर तालुक्यातील युवकाचा खून; रिक्षा चालकासह आई-वडिलांवर गुन्हा दाखल

या घटनेनंतर निरवाडीत उपविभागीय पोलिस अधिकारी पांडुरंग गोफने, तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
Gajanan Yadav Gite Passed Away
Gajanan Yadav Gite Passed Awaysaam tv
Published On

Parbhani :

सहकाऱ्यास ऑटोत बसविण्याच्या कारणावरून २६ वर्षीय युवकास चाकूने वार करून जीवे मारल्याची घटना परभणी जिल्ह्यातील चारठाणा पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील निरवाडी (बु) येथे मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी मुख्य आरोपीसह त्याची आई, वडील आदी तीन जणांविरुद्ध गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. (Maharashtra News)

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार जिंतूर तालुक्यातील पिंपरी (खुर्द) येथील गजानन यादव गिते हा त्याच्या सहकाऱ्यास निरवाडी (बु) गावात जाण्यासाठी ऑटोत बसवून देण्याच्या कारणाने मुख्य आरोपी ऑटोचालक अमोल काळे याच्यासोबत वाद झाला. याच कारणावरून चालक अमोलने गितेच्या पोटात शस्त्राने वार केले.

Gajanan Yadav Gite Passed Away
Orange Price : संत्र्याचा भाव काेसळला, वाशिम जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात

या घटनेची माहिती गजानन गितेने त्याच्या नातेवाइकांना दिली. त्याचे नातेवाईक निरवाडीत दाखल हाेताच त्यांनी जखमी गजानन गिते याला चारठाणा आरोग्य केंद्रात नेले. तेथे प्रथमोपचार करून पुढील उपचारास परभणीच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, तेथे डॉक्टरांनी तपासून गजानन गिते यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्यानंतर गिते याचे शवविच्छेदन परभणी सामान्य रुगणालयात करण्यात आले. या घटनेनंतर निरवाडीत उपविभागीय पोलिस अधिकारी पांडुरंग गोफने यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

Gajanan Yadav Gite Passed Away
Saam Impact : शाळेच्या व्हरांड्यात बसून धडे गिरवणा-या विद्यार्थ्याला शिक्षणाची कवाडे खूली, 'साम टीव्ही' मुळेच झाले शक्य आरे ग्रामस्थांची भावना

या प्रकरणात तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी परभणी गुन्हा अन्वेषण विभागाचे अधिकारी आणि श्वान पथकास देखील पाचारण केले होते. मयताचा चुलत भाऊ एकनाथ गिते याच्या फिर्यादीवरून अमोल काळे, त्याचे वडील गणेश काळे, आई मथुराबाई काळे या तिघांविरुद्ध चारठाणा पाेलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पाेलिसांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

Gajanan Yadav Gite Passed Away
पुणेकरांनो ! थकीत मिळकत कर भरा अन्यथा घरासमोर वाजेल बँड (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com