Austria : मोठी बातमी! बंदूक घेऊन विद्यार्थी शाळेत घुसला, जो दिसला त्याला उडवलं, ९ जणांचा मृत्यू ; स्वत:वरही झाडली गोळी

Austria 9 People Killed Entering School : ऑस्ट्रियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर ग्राझमधील एका शाळेत गोळीबाराची घटना घडली आहे. ऑस्ट्रिया प्रेस एजन्सीच्या वृत्तानुसार, ग्राझ शहराच्या महापौरांनी सांगितलं की, या गोळीबारात ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा मृत्यू झाला आहे.
Austria 9 People Killed Entering School
Austria 9 People Killed Entering SchoolSaam Tv News
Published On

ग्राझ : ऑस्ट्रियातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं शहर ग्राझमधील एका शाळेत गोळीबाराची घटना घडली आहे. ऑस्ट्रिया प्रेस एजन्सीच्या वृत्तानुसार, ग्राझ शहराच्या महापौरांनी सांगितलं की, या गोळीबारात ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा मृत्यू झाला आहे. एक विद्यार्थी शाळेत घुसला आणि त्याने अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं शाळा परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

विद्यार्थ्याने स्वतः शाळेत अंदाधुंद गोळीबार केला

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतील एक विद्यार्थी बंदूक घेऊन तिथे पोहोचला आणि जो दिसला त्याने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यानंतर, विद्यार्थ्याने वॉशरूममध्ये जाऊन स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिसांनी सांगितलं की त्यांना सकाळी १० वाजता (स्थानिक वेळेनुसार) माहिती मिळाली आणि त्यानंतर काही वेळातच शाळेच्या इमारतीतून गोळीबाराचा आवाज ऐकू आला.

Austria 9 People Killed Entering School
Crime News : पायात जोडवी, कंपाळावर कुंकू अन् शरीरावर जखमा, हिरव्या सूटकेसमध्ये आढळला विवाहितेचा मृतदेह

पोलिसांनी शाळा रिकामी केली

स्थानिक पोलिसांनी लोकांना त्या परिसरापासून दूर राहण्याचा आणि अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केले की शाळा रिकामी करण्यात आली आहे, आणि सर्वांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं आहे. त्यांनी पुढे सांगितलं की परिस्थिती नियंत्रणात आहे, आणि आता कोणताही धोका नाही. ऑस्ट्रियाचे ग्राझ शहर देशाच्या आग्नेय भागात आहे आणि त्याची लोकसंख्या सुमारे ३ लाख आहे.

मारल्या गेलेल्यांमध्ये हल्लेखोरही होता

अहवालानुसार, ग्राझ शहराचे महापौर एल्के काहर म्हणाले की, मृतांमध्ये ७ विद्यार्थी, एक शाळेतील कर्मचारी आणि एक गुन्हेगार होता ज्याने गोळीबार केला. शाळेतील गोळीबाराची चौकशी करण्याची जबाबदारी स्पेशल टास्क फोर्सकडे देण्यात आली आहे. ऑस्ट्रियाचे गृहमंत्री देखील ग्राझ शहराकडे रवाना झाले आहेत. पोलिसांनी लोकांना शांत राहण्याचे आणि अफवा टाळण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी सांगितले की, काही लोक जखमी देखील झाले आहेत, ज्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Austria 9 People Killed Entering School
Shocking: 'त्याने माझा वापर करून सोडलं', बड्या खासदारावर उच्चशिक्षित महिलेचा गंभीर आरोप; पोस्ट करत पत्ते उघड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com