Ambernath Municipal: कायदा धाब्यावर; दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच फ्री-स्टाइल हाणामारी|Video

Ambernath Municipal Fight Video: अंबरनाथ नगरपालिकेत दोन ठेकेदारांमध्ये हाणामारी झाली. विशेष म्हणजे पोलिसांसमोर दोन्ही गट एकमेकांना भिडले.
Parking dispute turns violent in Ambernath
Ambernath Municipal Fight Videosaam tv
Published On

अजय दुधाणे, साम प्रतिनिधी

अंबरनाथ पालिकेच्या परिसरात पार्किंग टेंडरच्या वादातून दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. या राड्यात दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे ही फ्री-स्टाइल हाणामारी चक्क पोलिसांसमोरच झाली. यावरून कायद्याचा धाक कोणालाच राहिला नसल्याचं दिसून येत आहे. (fight erupts between groups in Ambernath municipal area over parking deal)

अंबरनाथ नगरपालिकेत दोन ठेकेदारांमध्ये काही दिवसांपासून वाद चालू आहे. आज दोन्ही गटात तुबळ हाणामारी झाली. नगरपालिकेत लहान मोठी कामे करणारा ठेकेदार बॉस्को सुसाईनाथ आणि व्यंकटेश पिचिकरन यांच्या गटात मारामारी झाली. काही दिवसापूर्वी वाद झाल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. आज पालिका कार्यालयात फेरीवाल्यांची निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच दोन्ही गटात हाणामारी झाली. विशेष म्हणजे तेथे पोलीस कर्मचारी सुद्धा उपस्थित होते.

Parking dispute turns violent in Ambernath
दुसऱ्यासोबत बायको OYO Hotel मध्ये, अचानक नवऱ्याची झाली एन्ट्री, धांदल उडताच बाल्कनीतून उडी; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

या हाणामारीत व्यंकटेश या ठेकेदाराच्या समर्थकांनी बॉस्कोला जबर मारहाण झाली असून तो गंभीर जखमी झालाय. ही फ्री स्टाईल हाणामारी सुरू असताना लागलीच पोलिसांनी आणि अंबरनाथ पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस हस्तक्षेप करीत असताना देखील दोन्ही गट एकमेकांवर अंगावर धावून जात होते.

Parking dispute turns violent in Ambernath
Nanded Crime News: लग्नाच्या 12 दिवसातच विवाहितेचा मृत्यू; हुंड्यासाठी हत्या केली, नातेवाईकांचा आरोप

दरम्यान त्यानंतर पोलिसांनी झटपट कारवाई करत दोन्ही गटांतील सुमारे १० ते १२ जणांना ताब्यात घेतले आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.पालिकेतील पार्किंग टेंडर प्रक्रियेमध्ये सुरू असलेल्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे पालिकेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com