Akola Crime : जावयाबरोबर मासे पकडायला गेला अन् परतलाच नाही; वाटेतच घडलं असं काही... घटनेनं पोलिसही चक्रावाले

Akola Crime News : सायंकाळ होत आली मुले आणि जावई घरी परतले, मात्र त्यांच्याबरोबर असलेले बाबा घरीच पोचलेच नाही. अखेर ज्या ठिकाणी मासे पकडण्यासाठी गेले, तिथे सर्वजण रवाना झाले आणि इथे पोहोचताच खार नाल्यात त्यांचा मृतदेह दिसून आला.
Akola Crime News
Akola CrimeSaam TV

अक्षय गवळी, साम टीव्ही

60 वर्षीय व्यक्ती मुलांसह जावयाबरोबर मासे पकडायला गेले. पण सायंकाळ होत आली मुले आणि जावई घरी परतले, मात्र त्यांच्याबरोबर असलेले बाबा घरीच पोचलेच नाही. त्यामुळे मुलांसह जावयानं त्यांचा शोध घेतला. अखेर ज्या ठिकाणी मासे पकडण्यासाठी गेले, तिथे सर्वजण रवाना झाले आणि इथे पोहोचताच खार नाल्यात त्यांचा मृतदेह दिसून आला.

Akola Crime News
Vasai Crime News: बायकोसोबत फ्लर्ट करायचा; नवऱ्याला राग आला, मित्राला संपवलं!

हे पाहताच कुटुंबियांनी मोठा टाहो फोडला. हा संपूर्ण प्रकार अकोला जिल्ह्यातील दहीहंडा पोलीस स्टेशन हद्दीतल्या वरूळ जाऊळका शेतशिवारातल्या खार नाल्याजवळ घडला. साहेबराव श्रीराम रामचवरे (वय 60) असं मृतक व्यक्तीचे नाव आहे. ते मूळ वरुळ जाऊळका येथीलच रहिवासी आहेत.

विशेष म्हणजे साहेबराव यांच्या मृत्यूमागे घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण मृतदेहाजवळ एक दोरी आढळून आली आहे. साहेबराव यांचा गळा आवळून खून केल्याचा संयश पोलिसांकडून व्यक्त केला जातोय. मात्र वैद्यकीय अहवालानंतर सर्व बाबी स्पष्ट होतील, असंही पोलिसांचं म्हणणं आहे.

नेमकं काय घडलं होतं?

अकोला जिल्ह्यातील वरुळ जाऊळका गाव येथे काल 27 मे रोजी सकाळी 11 वाजता साहेबराव रामचवरे हे त्यांच्या 2 मुलांसह जावाई आणि गावातील एक व्यक्तीसह मासेमारी करण्यासाठी शेतशिवारातील खार नाल्याजवळ गेले. त्यानंतर खार नाल्यापासून काही अंतरावर बराच वेळ तिथे थांबले. थोड्यावेळात साहेबराव नाल्यात खाली जाण्यासाठी उतरले, आणि उर्वरित त्यांच्यासोबत सर्वजण हे पुन्हा गावाच्या दिशेने रवाना झाले.

सायंकाळचे 6 वाजले अजूनही साहेबराव घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला. पुन्हा नाल्याच्या दिशेने रवाना झाले आणि नाल्याजवळच कुटुंबियांना मृतदेह दिसून आला. लागलीच या घटनेची माहिती दहीहंडा पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनांसाठी दाखल झाले, याशिवाय स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेटी दिल्या. सुरुवातीला पंचनामा करून पुढं मृतदेह वैद्यकीय तपासण्यासाठी अकोट इथे रवाना करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत पोलिसांचा तपास सुरू होता. सध्यास्थित या प्रकरणात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून वैद्यकीय अहवालानंतर संपूर्ण खुलासे उघड होणारे.

साहेबराव यांच्या बँक अकाउंटमध्ये लाखो रूपये?

साहेबराव यांच्या बँक अकाउंटमध्ये लाखो रुपये असल्याचे चर्चा गावात सुरुये. साहेबराव यांचा मूळ व्यवसाय म्हणजे मासेमारी आणि तसेच इतर शिकार सारखं कामगाज ते करायचे. त्यांना रोजगार चांगला व्हायचा त्यातून त्यांनी मोठ्याप्रमाणात रक्कम गोळा केली. त्यांना या पैशातून शेती घ्यायची होती. कदाचीत साहेबराव यांच्या मृत्यू मागील कारण पैशाचं तर नाही ना याचाही तपास पोलीस करीत आहे. लवकरच साहेबराव यांचं जिथे बँकेत अकाउंट आहे, तेथे एक पत्र पाठवून अकाउंटमध्ये असलेल्या रक्कमेबाबत सहानिशा करण्यात येणार असल्याचे, पोलीस निरीक्षक ठाकरे यांनी म्हटले आहे.

Akola Crime News
Mumbai Crime News: बायकोच्या मारहाणीत नवऱ्याचा मृत्यू, चेंबूरमधील घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com