Akshay Nagalkar Killing Case: शेतात जाळलं, हत्यारासह हाडं ठेवली लपवून; महाराष्ट्राला हादरवणारं 'MH 30' हॉटेल हत्याकांड

Akola Crime Akshay Nagalkar Killing Case: अकोल्यातील अक्षय नागलकर हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. नऊ आरोपींना अटक करण्यात आलीय. पोलिसांनी आरोपींकडून जळालेली हाडे, दोन पिस्तूल, एक कोयता आणि इतर पुरावे जप्त केले आहेत.
Akola Crime  Akshay Nagalkar Killing Case
Police reveal shocking details in the Akshay Nagalkar murder case; burnt bones, weapons, and pistols recovered from the field near Akola.saam tv
Published On
Summary
  • अकोल्यातील अक्षय नागलकर खून प्रकरणाचा उलगडा

  • ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

  • पोलिसांनी हाडांचे तुकडे, पिस्तुलं, कोयता अशी हत्यार जप्त केली आहेत.

अकोल्यासह महाराष्ट्राला हादरवरून सोडणारं अक्षय नागलकर खून प्रकरणाचा उलगडा अखेर पोलिसांनी केलाय. या हत्याकांडात एकूण ९ आरोपींना अटक करण्यात आलीय. अक्षयच्या मारेकऱ्यांनी अक्षयच्या हत्येसाठी दोन देशी पिस्तूल आणि कोयत्याचा वापर केला होता.

खूनाचा उलगडा केल्यानंतर पोलिसांनी आरोपींकडून मृतकाच्या हाडांचे तुकडे, राख, २ देशी पिस्तुल, कोयता, ६ जिवंत काडतुसे, टाटा इंडिगो कार, ३ मोटारसायकली,७ मोबाइल फोन असे साहित्य ताब्यात घेतलंय. हाडांच्या तुकड्यांची डीएनए चाचणी तेली जाणार आहे. ही माहिती पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी पत्रकार परिषदेत दिलीय.

चार दिवसांनी अक्षयचा खून झाल्याचं उघड

अकोला शहरातील अक्षय विनायक नागलकर हा २२ ऑक्टोबरपासून बेपत्ता झाला होता. लवकर घरी परत येईनं सांगून तो २२ ऑक्टोबरच्या रोजी घराबाहेर पडला होता. मात्र तो घरी परतलाच नाही. दुसऱ्या दिवशी कुटुंबीयांनी डाबकी रोड पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद केली.तपासादरम्यान नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने पोलीस अधीक्षक अर्चीत चांडक यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील व स्थानिक गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली ८ पथके तयार करून तपासाला गती दिली.

९ जणांना अटक

चार दिवसांनी अक्षयचा खून झाल्याचं समोर आलं. याप्रकरणी पोलिसांनी आधी ४ जणांना ताब्यात घेतलं. त्यानंतर आणखी चौघांना अटक करण्यात आल. तर आणखी एकाला याप्रकरणी अटक झाली. आतापर्यंत याप्रकरणात ९ जणांना अटक झालीय. पोलिसांनी चंदू बोरकर, आशु वानखडे, श्रीकृष्ण भाकरे, ब्रह्मा भाकरे, रोहित पराते, अमोल उन्हाळे, आकाश शिंदे, नारायण मेसरे, शिवा माळी या नऊ आरोपींना अटक केलीय.

Akola Crime  Akshay Nagalkar Killing Case
Akola Crime: 'माझं तुझ्यावर खूप प्रेम; अग्निवीर जवानाकडून लग्नाच्या भूलथापा, 29 वर्षीय किन्नरवर अत्याचार

हत्येसाठी हॉटेल भाड्यानं घेतलं

पोलीस तपासादरम्यान अक्षयचा चंदू बोरकरसोबत आधी वाद झाला होता. त्यानेच हत्येचा कट रचला होता. हत्येच्या दिवशी अक्षयला त्याचा मित्र आशु वानखडे याने दुचाकीवर घेऊन गेला होता. अक्षयची हत्या करण्यासाठी आरोपींनी गायगाव रोडवरील बंद हॉटेल भाड्याने घेतलं होतं. जेवणाच्या बहाण्याने आशु वानखडे अक्षयला या हॉटेलमध्ये घेऊन आला होता.

हॉटेलमध्ये गेल्यानंतर आरोपींनी हॉटेलचे शटर बंद केलं. त्यानंतर त्याला धमकावत धारदार शस्त्राने अक्षयचा खून केला.

Akola Crime  Akshay Nagalkar Killing Case
Pune Gang war: भर चौकात गणेशचा केला गेम; हाती कोयता घेऊ मारेकऱ्यांची धूम, हत्याकांडाचा CCTV आला समोर

यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी शेतात टिनची रूम बनवून मृतदेह जाळला आणि राख नदीत टाकली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे ४८ तासांत संशयित आरोपी चंद्रकांत (चंदू) बोरकर, आशिष उर्फ आशु वानखडे, श्रीकृष्ण भाकरे व अशोक उर्फ ब्रह्मा भाकरे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली त्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com