Shocking : चप्पल घालून दुकानात आला, दुकानदार अन् ग्राहकामध्ये जोरदार हाणामारी,  कराडमध्ये तरुणाचा मृत्यू
Maharashtra NewsSaam Tv

Shocking : चप्पल घालून दुकानात आला, दुकानदार अन् ग्राहकामध्ये जोरदार हाणामारी, कराडमध्ये तरुणाचा मृत्यू

Karad News : कराड बसस्थानक परिसरातील मोबाईल शॉपीत झालेल्या किरकोळ वादातून अखिलेश नलवडे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Published on
Summary
  • कराड बसस्थानक परिसरातील मोबाईल शॉपीत किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू

  • मोबाईल कॅमेरा व्यवस्थित न चालल्याने ग्राहक तक्रार करण्यासाठी गेला होता

  • चप्पल न काढता दुकानात गेल्यामुळे झालेल्या धक्काबुक्कीत मृत्यू

  • पोलिसांनी अजीम मुल्ला या आरोपीस ताब्यात घेतले असून तपास सुरू

कराड शहरातील बस स्थानक परिसरात घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मोबाईल शॉपीमध्ये चप्पल न काढता गेलेल्या ग्राहकाला मोठा फटका बसला. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून ग्राहक अखिलेश नलवडे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात एकाला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी ग्राहक अखिलेशने एका मोबाईल शॉपीतून नवीन मोबाईल खरेदी केला होता. मात्र त्या मोबाईलचा कॅमेरा व्यवस्थित काम करत नसल्याने तो आणि त्याचे दोन मित्र दुकानात तक्रार करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी दुकानात फरशी पुसण्याचे काम सुरू होते.

Shocking : चप्पल घालून दुकानात आला, दुकानदार अन् ग्राहकामध्ये जोरदार हाणामारी,  कराडमध्ये तरुणाचा मृत्यू
Kalyan Traffic : कल्याण पोलिसांचा वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठा निर्णय; नवरात्रौत्सव काळात जड वाहनांना बंदी

ग्राहक अखिलेश चप्पल न काढता दुकानात गेल्याने फरशीवर चिखल पडला आणि त्यावरून वाद निर्माण झाला. या वादात धक्काबुक्की झाली आणि अखिलेश जमिनीवर जोरात आपटला. त्याला तातडीने कराड उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

Shocking : चप्पल घालून दुकानात आला, दुकानदार अन् ग्राहकामध्ये जोरदार हाणामारी,  कराडमध्ये तरुणाचा मृत्यू
Shocking : धावताना कोसळला अन् जागेवरच गेला! सैन्यात भरतीचं स्वप्न घेऊन गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक चौकशीत या प्रकरणात अजीम मुल्ला या युवकाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेची पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, अखिलेशच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com