Ahmednagar Crime News: मित्रांनीच केला घात! तरुणाची हत्या करून विहिरीत फेकलं; राहुरीतील धक्कादायक घटना

Friends Killed Youth In Shilegaon: राहुरी तालूक्यातील शिलेगाव येथे ३० वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. पाण्यावर तरंगत असलेला तरुणाचा मृतदेह आढळून आला होता.
Ahmednagar Crime News
Ahmednagar Crime NewsYandex

सचिन बनसोडे, साम टीव्ही अहमदनगर

राहुरी तालूक्यातील शिलेगाव येथे ३० वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. विजय जाधव असं या मृत तरुणाचं नाव आहे. त्याला लाकडी दांड्याने मारहाण केली गेली. त्यानंतर त्याचे हातपाय बांधून मुळा नदी पात्रात असलेल्या एका विहिरीत टाकून दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेने अहमदनगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

नक्की काय घडलं?

अहमदनगर जिल्ह्यातील शिलेगाव येथे एका शेतकऱ्याच्या विहिरीत लाकडी दांडे, चप्पल आणि पाण्यावर तरंगत असलेला तरुणाचा मृतदेह (Youth Killed) आढळून आला. घाबरून या शेतकऱ्याने पोलिसांनी संपर्क केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हा मृतदेह बाहेर (Ahmednagar Crime News) काढला. हा मृतदेह राहुरी तालुक्यातील आरडगाव येथील तरूणाचं असल्याचं समोर आलं. राहुरीत मित्रांचं धक्कादायक कृत्य समोर आल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

या तीस वर्षीय तरूणाचं नाव विजय अण्णासाहेब जाधव (Ahmednagar) असल्याचं निष्पन्न झालं. पोलीस चौकशीमध्ये काही महत्त्वपूर्ण माहिती समोर आली. विजय हा १५ मे रोजी त्याच्या काही मित्रांसोबत शिलेगाव येथील यात्रेत गेला होता. यात्रेमध्ये विजयचं मित्रांसोबत काही कारणावरून भांडण झालं होतं. त्यावेळी त्याच्या मित्रांपैकी चार ते पाच जणांनी विजयला लाथा बूक्क्यांनी आणि लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली होती, अशी माहिती समोर आलीय.

Ahmednagar Crime News
Mother And Son Killed In Amravati: दुहेरी हत्याकांडाने अमरावती हादरलं; ३०० फुट जागेसाठी मायलेकाला संपवलं

त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज (१६ मे) सकाळीच विजयचा हातपाय बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह विहिरीत (Rahuri) आढळून आला आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र, विजय जाधव याचा खून नेमका कोणत्या कारणामुळे झाला? हे तपासातच निष्पन्न होईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

Ahmednagar Crime News
Son killed mother : बायकोसोबत मोबाईलवर बोलताना आई मध्येच बोलली; रागाच्या भरात मुलाकडून धारदार शस्त्राने हत्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com