Nanded Crime
Nanded CrimeSaam Tv

Nanded Crime: अनैसर्गिक अत्याचारानंतर ११ वर्षीय मुलाचा खून; ८ वर्षानंतर न्यायालयाने आरोपीला सुनावली मृत्युदंडाची शिक्षा

Nanded Crime: पीडित अकरा वर्षीय मुलगा अंगणात खेळत होता , त्यावेळी आरोपीने त्या मुलाचं अपहरण केलं. अपहरणानंतर आरोपीने या मुलावर अत्याचार केले. दरम्यान न्यायालयाने ८ वर्षानंतर आरोपीला फाशीची शिक्षा सुनावलीय.
Published on

संजय सूर्यवंशी, नांदेड

11 Year Boy Unnatural Physical Abused :

अकरा वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याचा खून करणाऱ्या आरोपीला बिलोली न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलीय. नांदेड जिल्ह्यातील सावरगाव २०१७ साली हा संतापजनक प्रकार घडला होता. गिरीष कोटेवाड, असं या आरोपीचं नाव आहे.(Latest News)

जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात असलेली सावरगाव राहणाऱ्या एका मुलावर अत्याचार झाला होता. पीडित अकरा वर्षीय मुलगा अंगणात खेळत होता. त्यावेळी आरोपी गिरीष कोटेवाड याने त्याचे अपहरण केले. त्यानंतर त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याचा खून केला. त्यानंतर झालेल्या पोलीस चौकशीनंतर त्याच रात्री गावातील परिसरात मुलाचा मृतदेह आढळला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान या खटल्याची सुनावणी बिलोली न्यायालयात आज झाली . न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकला. या खटल्यात एकूण १२ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. कोटेवाड हा आरोपी सिद्ध झाल्यानंतर खून प्रकरणात त्याला फाशी शिक्षा १० हजार रुपयांचा दंड तसेच अनैसर्गिक अत्याचार प्रकरणी १० वर्षे तुरुंगवास अशी शिक्षा न्यायालयाने (court) ठोठावलीय.

६ वर्षांच्या चिमुकलीची अत्याचार करून हत्या

मुदखेड पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील ६ वर्षीय चिमुकली रविवारी दुपारपासून बेपत्ता होती. मुलगी सायंकाळ घरी न परतल्याने ग्रामस्थ आणि पोलिसांनी शोध घेतला पण मुलगी मिळाली नाही. सोमवारी सकाळी चिमुकलीचा मृतदेह मुदखेड ऊमरी रोडवर रस्त्याशेजारी झुडुपात फेकलेला आढळला. या घटनेमुळे मुंदखेड परिसर हादरून गेला.

गावापासून 12 किमी दूर चिमुकलीचा मृतदेह आढळला आहे. चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काही संशयित आरोपी असून त्यादृष्टीने पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.

Nanded Crime
Navi Mumbai Crime: प्रेयसीची हत्या करत स्वतः केली आत्महत्या ; सांकेतिक क्रमांक लिहत रचलेल्या कटाचा पोलीस तपासात उलगडा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com