Zomato Platform Fee: झोमॅटोचा ग्राहकांना मोठा झटका; प्रत्येक ऑर्डरमागे मोजावे लागणार अधिकचे पैसे, 'ही' सेवा केली बंद

Zomato Platform Fee Hike By 25 Percent: ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने प्लॅटफॉर्म फी वाढवली आहे. झोमॅटो ग्राहकांना प्रत्येक ऑर्डरवर पाच रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.
Zomato
Zomato Platform FeeYandex
Published On

झोमॅटो (Zomato) ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. आता झोमॅटोनेही ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने प्लॅटफॉर्म फी वाढवली आहे. झोमॅटोने २५ टक्के शुल्क वाढवून प्रति ऑर्डर ५ रुपये केले आहे. याशिवाय कंपनीने आपली इंटरसिटी लीजेंड्स सेवाही बंद केली आहे. मार्च तिमाहीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी झोमॅटोने हे निर्णय घेतले आहेत.

त्यामुळे यापुढे आता झोमॅटो ग्राहकांना प्रत्येक ऑर्डरवर पाच रुपये जास्त मोजावे (Zomato Platform Fee Hike) लागणार आहेत. झोमॅटोने ऑगस्ट २०२३ मध्ये प्लॅटफॉर्म फी २ रुपये आकारण्यास सुरूवात केली होती. कंपनीने नफा वाढवण्यासाठी आणि नफा मिळवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. यानंतर कंपनीने दोनदा प्लॅटफॉर्म शुल्क वाढवले होते.

झोमॅटोने ३१ डिसेंबर रोजी प्लॅटफॉर्म शुल्क तात्पुरते ९ रुपये केले होते. परंतु आता आपल्याला प्रत्येक ऑर्डरवर ५ रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. जानेवारीमध्ये शुल्क (Zomato Platform Fee Hike) वाढल्यानंतर झोमॅटोच्या शेअर्समध्ये वाढ झाली होती. प्लॅटफॉर्म शुल्क वाढल्यामुळे डिलिव्हरी चार्जेसवरील जीएसटीही वाढेल, असं तज्ज्ञांचं मत आहे.

झोमॅटो दरवर्षी सुमारे ८५ ते ९० कोटी ऑर्डर वितरित करते. प्लॅटफॉर्म शुल्कात एक रुपयाची वाढ केल्याने कंपनीला ८५ ते ९० कोटी रुपये अतिरिक्त मिळतील. मात्र, वाढलेले शुल्क सध्या ठरावीक (Zomato Update) शहरांमध्येच लागू करण्यात आले आहे. कंपनीने आपली इंटरसिटी लीजेंड्स सेवा बंद करण्याचा निर्णय देखील घेतला आहे.

Zomato
Viral Video : सलाम तुझ्या जिद्दिला! Zomato डिलिव्हरी बॉय बाइकवर करतोय UPSC चा अभ्यास, पाहा व्हिडिओ

या अंतर्गत कंपनी मोठ्या शहरांमधील टॉप रेस्टॉरंटमधून इतर शहरांमध्ये खाद्यपदार्थ पोहोचवत होती. लीजेंड्स टॅब आता झोमॅटोच्या ॲपवर काम करत नाही. परंतु सध्या ही सेवा थांबवण्यात आल्याची (Zomato Platform Fee Hike By 25 Percent) माहिती मिळत आहे. कंपनीच्या वेबसाईटवरवर क्लिक केल्यावर लीजेड्स सेवा तात्पुरती स्थगित केल्याची माहिती मिळत आहे.

झोमॅटो नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत (Zomato Platform Fee) आहे. झोमॅटोचे उत्पन्न डिसेंबर तिमाहीत ३० टक्क्यांनी वाढून २,०२५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. याशिवाय ब्लिंकिटचे उत्पन्नही दुप्पट वाढून ६४४ कोटी रुपये झाले आहे. यामुळेच झोमॅटोचा स्टॉक झपाट्याने वाढत आहे. झोमॅटोला एका वर्षापूर्वी ३४७ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता, परंतु डिसेंबर तिमाहीत १३८ कोटी रुपयांचा नफा झाला होता.

Zomato
Zomato Delivery : झोमॅटोच्या माध्यमातून दारू विक्रीचा अजब प्रकार; संभाजीनगरात उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com