Lakh Vs Lac On Cheque: तुम्ही चेकवर Lakh लिहिता की Lac? जाणून घ्या बँकेचा नियम

RBI Rules for cheque: तुमचा चेकवर इंग्रजीमध्ये लाखाची स्पेलिंग लिहिताना गोंधळ होतो, तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे.
Lakh vs lac in Cheque
Lakh vs lac in ChequeSaam tv
Published On

How to Write One Lakh on Cheque:

तुमचा चेकवर इंग्रजीमध्ये लाखाची स्पेलिंग लिहिताना गोंधळ होतो, तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. तुम्ही चेकवर लाखाची स्पेलिंग लिहित असाल तर तुम्ही Lakh असेच लिहा. अन्यथा तुमचा चेक रिजेक्ट होण्याची शक्यता आहे. चेकसंदर्भातील आरबीआय आणि बँकेचे नियम जाणून घेऊयात. (Latest Marathi News)

आरबीआयने जारी केलेल्या नियमांचं बँकांना पालन करावं लागतं. आरबीआयने चेकवर लाखाचं इंग्रजी स्पेलिंगबाबत असा कोणताही नियम तयार केला नाही. परंतु आरबीआयच्या वेबसाईटवर Lakh असेच लिहिले आहे. त्यामुळे बँका आरबीआयचं अनुकरण करतात.

बँकांच्या नियमानुसार, lAKH स्पेलिंग चेकवर लिहिणं योग्य आहे. तर चेकवर LAC लिहिल्यास बाउंन्स होण्याची शक्यता आहे.

Lakh vs lac in Cheque
Rules Change In 1st September : सप्टेंबर महिन्यात 2000च्या नोटेसह अनेक नियमांमध्ये होणार बदल, वाचा सविस्तर

शब्दकोशात अर्थ काय?

Lakh आणि lac या दोन्हीचे अर्थ वेगवेगळे आहे. इंग्रजी शब्दकोशानुसार, Lakh याचा अर्थ अंक दर्शवतो. तर lac याचा अर्थ कीटकांनी सोडलेला चिकट पदार्थ असा होतो. या पदार्थाचा उपयोग सीलिंग वॅक्स, डाय तयार करण्यासाठी होतो.

चेकवर दोन प्रकारे रक्कम लिहिले जाते. चेकवर रक्कम लिहिताना अंक आणि अक्षर या दोन्ही स्वरुपात लिहिली जाते. तुमचा चेकवर Lakh किंवा Lac लिहिताना गोंधळ झाला तरी चालेल, पण चेकवर अंकात रक्कम लिहिताना गडबड होता कामा नये.

Lakh vs lac in Cheque
Ola Uber: ओला-उबर चालकांना हायकोर्टाचा दणका, राईड रद्द केल्यास प्रवाशांच्या खात्यात जमा होणार पैसे

चेकवर रक्कम लिहिताना गडबड झाल्यास चेक रद्द होऊ शकतो. त्यामुळे चेकवर अंक स्वरुपात रक्कम लिहिता काळजी घ्या.चेकवर अंक लिहिताना काळजी घेतल्यास पुढे कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com