Whatsapp Feature: तुमचाही प्रोफाईल फोटो Viral होण्याची भिती वाटतेय? WhatsApp आणतंय नव Security फीचर, वाचा सविस्तर

Whatsapp New Feature: व्हॉट्सअॅपने नवीन सिक्युरिटी फीचर लाँच केले आहे. ज्यामुळे तुमचा प्रोफाइल फोटोचा कोणालाच स्क्रिनशॉट काढता येणार नाही. व्हॉट्सअॅपवर आपण प्रोफाइल फोटो ठेवतो. या प्रोफाइल फोटोचा स्क्रिनशॉट काढून अनेक लोक त्याचा वापर करतात. त्यामुळेच हे नवीन फीचर लाँच केले आहे.
Whatsapp
Whatsapp Saam Tv
Published On

Whatsapp New Feature For Security Of Profile Photo:

जगभरातील लाखो लोक व्हॉट्सअॅपचा वापर करतात. व्हॉट्सअॅपचा वापर करुन कोणतीही माहिती एका क्लिकवर आपल्याला मिळतो. परंतु व्हॉट्सअॅपचा वापर करुन अनेक स्कॅम होण्याची भीती असते. अनेक लोक तुमच्या प्रोफाइल फोटोचा गैरवापर करतात. परंतु आता व्हॉट्सअॅपने नवीन सिक्युरिटी फीचर लाँच केले आहे. ज्यामुळे तुमचा प्रोफाइल फोटोचा कोणालाच स्क्रिनशॉट काढता येणार नाही.

व्हॉट्सअॅपवर आपण प्रोफाइल फोटो ठेवतो. या प्रोफाइल फोटोचा स्क्रिनशॉट काढून अनेक लोक त्याचा वापर करतात. त्यामुळेच हे नवीन फीचर लाँच केले आहे. (Latest News)

व्हॉट्सअॅपने काही दिवसांपूर्वी यूजर प्रोफाइल फोटो सेव्ह किंवा डाउनलोड करण्याचा ऑप्शन बंद केला होता. त्यानंतर आता स्क्रिनशॉटसाठी नवीन फीचर लाँच केले जाणार आहे. ज्यामध्ये कोणालाही तुमच्या प्रोफाइल फोटोचा स्क्रिनशॉट काढता येणार आहे. हे फीचर अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. जर कोणाला तुमच्या प्रोफाइन फोटोचा स्क्रिनशॉट घ्यायचा असेल तर तुमची स्क्रिन ब्लॅक होईन किंवा तुम्हाला संदेश मिळेल.

या फीचरमध्ये युजर्संना प्रोफाइल फोटोचा स्क्रिनशॉट घ्यायचा असेल तर तुम्हाला व्हॉट्सअॅप युजरची परवानगी घ्यावी लागेल. असे न केल्यास तुम्हाला वॉर्निंग देण्यात येईल. हे नवीन फीचर युजर्ससाठी लवकर उपलब्ध होणार आहे.

Whatsapp
Bank Holiday: मार्चमध्ये बँकांना १४ दिवस सुट्टी, एका क्लिकवर वाचा यादी

व्हॉट्सअॅपने काही दिवसांपूर्वी टेक्स्टसाठी नवीन फॉरमॅटिंग पर्याय सादर केले आहेत. यामुळे तुम्ही मेसेज चांगल्या पद्धतीने मांडू शकतात.

यासोबतच व्हॉट्सअॅपमध्ये आता तुम्ही दोन अकाउंट वापरु शकता. जर तुमच्याकडे ड्युअल सिम कार्डला सपोर्ट करणारा फोन असेल तर आधी व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करा.अपडेट झाल्यानंतर फोनवर व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा. सेटिंग्जवर क्लिक करुन नवीन खातेवर जा.तुमचा दुसरा फोन नंबर एंटर करा आणि पुढील टॅपवर क्लिक करा. एसएमएसद्वारे तुम्हाला कोड येईल. पडताळणी झाल्यानंतर तुम्ही दुसरे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट सहज सेट करु शकता.वरच्या डाव्या कोपऱ्यात तुमच्या प्रोफाइलवर टॅप करा. जेव्हा तुम्हाला वापरायचे असेल तेव्हा खात्यावर क्लिक करा.

Whatsapp
E Shram Card: सरकार देतंय २ लाखापर्यंतचा अपघात विमा, लवकर काढून घ्या 'हे' कार्ड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com