Whatsapp New Features: व्हॉट्सअॅप वापरताना येणार आणखी धम्माल, स्पेशल फीचर आले...

Vishal Gangurde

लय भारी फीचर्स

व्हॉट्सअॅप चॅनलवर अनेक नवीन फीचर्स आले आहेत. याबाबत व्हॉट्सअॅप प्रमुखांनी माहिती दिली आहे. त्यांनी स्वतःच्या व्हॉट्सअॅप चॅनलवर पोल अॅड केला आणि एक व्हाइस नोट शेअर केली आहे.

WhatsApp | Yandex

मार्क झुकरबर्गने शेअर केली डीटेल्स

Meta सीईओ मार्क झुकरबर्ग यानेही याबाबत सविस्तर माहिती शेअर केली आहे. आम्ही व्हॉट्सअॅप चॅनलवर व्हाइस नोट, मल्टिपल अॅडमिन आणि स्टेटस शेअरिंग, पोल यांसारखे फीचर्स अॅड करत आहोत, असे त्याने सांगितले.

WhatsApp Message | Yandex

फायदा काय?

व्हॉट्सअॅप चॅनलमध्ये हे सर्व फीचर्स मिळतील. चॅनलवर अॅडमिन पोल क्रिएट करता येईल. त्यावर सर्व मेंबर्स मत नोंदवू शकतील.

Whatspp features in marathi | Saam tv

मल्टिपल अॅडमिन

एखादी सविस्तर माहिती व्हाइस मेसेजद्वारे पाठवता येणे शक्य होईल. एखाद्या चॅनलचे अनेक अॅडमिन होऊ शकतात. त्यामुळे संबंधित चॅनलवर एकापेक्षा जास्त मेंबर्स पोस्ट करू शकतील.

Multiple admin | Saam tv

व्हाइस मेसेज

कंपनीने सांगितले की, त्यांच्या प्लॅटफॉर्मवर दरदिवशी ७ अब्ज व्हाइस मेसेज पाठवले जातात. आता हे फीचर व्हॉट्सअॅप चॅनलवरही उपलब्ध होईल.

woman using mobile | Saam tv

किती अॅडमिन होऊ शकतात?

एखाद्या चॅनलचे १६ अॅडमिनही होऊ शकतात. याशिवाय कंपनीने शेअर टू स्टेटस हे फीचरही आणले आहे. यूजर्स चॅनल्सवरील अपडेट्स स्टेटसवरही शेअर करू शकतात.

mobile users group | Saam tv

स्टेटस ठेवता येणार

जर तुम्ही एखाद्या चॅनलला फॉलो करत असाल तर, त्यावरील डिटेल्स आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवरही शेअर करू शकता.

Mobile use | Canva

टीमला फायदा

'व्हॉट्सअॅप चॅनल' हे फीचर कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लाँच केलं होतं. यूजर्सला एकाच ठिकाणी माहिती शेअर करता येते.

Mobile Users | Canva

ग्रुपपेक्षा हटके

व्हॉट्सअॅप ग्रुपपेक्षा चॅनल हे फीचर हटके आहे. ग्रुपमध्ये सर्व मेंबर्स पोस्ट करू शकतात. चॅनलवर तसं करता येत नाही. इथं फक्त अॅडमिनच पोस्ट शेअर करू शकतो. उर्वरित सर्व मेंबर चॅनल फॉलो करतात.

man using mobile | Saam tv

Next: शिवडी-नाव्हाशेवा अटल सेतूवरून बेस्ट धावणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Trans Harbour Link | Google
येथे क्लिक करा