PM Vishwakarma Kaushal Samman Yojana: विश्वकर्मा योजना काय आहे? छोट्या व्यावसायिकांना कसा घेता येईल लाभ?

Who Eligible For PM Vishwakarma Kaushal Samman Yojana : विश्वकर्मा योजना काय आहे? त्याचा लाभ कोणत्या व्यावसायिकांना घेता येईल?
PM Vishwakarma Kaushal Samman Yojana
PM Vishwakarma Kaushal Samman YojanaSaam tv
Published On

PM Modi Scheme : पंतप्रधान मोदींना आज देशाला लाल किल्ल्यावरुन संबोधित केले आहे. आज भारत देशाचा ७७ व्या स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना कारागीर व कामगारांसाठी विश्वकर्मा योजनेची घोषणा केली.

विश्वकर्मा योजना काय आहे? त्याचा लाभ कोणत्या व्यावसायिकांना घेता येईल? ही योजना कधी सुरु होईल याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

PM Vishwakarma Kaushal Samman Yojana
Bank FD Schemes Updated (Aug 2023) : बँकेत एफडी करण्याचा विचार करताय? हीच ती योग्य वेळ!

विश्वकर्मा योजनेसाठी सरकार १३००० कोटी रुपयांपासून (Money) ते १५००० कोटींपर्यंत मदत करणार आहे. ही योजना प्रामुख्याने विशिष्ट शैलीतील कुशल कामगारांसाठी असेल. या योजनेचे पूर्ण नाव PM विश्वकर्मा कौशल सन्मान योजना किंवा PM विकास योजना आहे . ही योजना 2023 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली होती .

1. पीएम विश्वकर्मा योजना म्हणजे काय?

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा उद्देश कौशल्य प्रशिक्षण, तंत्रज्ञान आणि आर्थिक सहाय्य प्रदान करून देशभरातील छोट्या व्यावसायिकांची (Business) क्षमता वाढवणे आहे. या योजनेअंतर्गत कुशल कारागिरांना एमएसएमईशी जोडले जाईल, जेणेकरून त्यांना चांगली बाजारपेठ मिळू शकेल.

PM Vishwakarma Kaushal Samman Yojana
Smallest Hill Station Near Mumbai : मुंबईजवळचं नयनरम्य, पण सगळ्यात छोटं हिल स्टेशन, घरी यावंसंच वाटणार नाही!

2. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

सुतार, सोनार, शिल्पकार आणि कुंभार या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ (Benefits) मिळणार आहे. याद्वारे कारागिरांच्या उत्पादनांचा आणि सेवांचा दर्जा वाढविण्याचा तसेच त्यांना देशांतर्गत बाजारपेठ आणि जागतिक बाजारपेठेशी जोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

PM Vishwakarma Kaushal Samman Yojana
Indian Railway Rules: गणपतीत कोकणात जायचा प्लान करताय? लोअर बर्थ सीट कशी मिळेल? जाणून घ्या रेल्वेचा नियम

अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करताना अर्थमंत्र्यांनी म्हटले होते की, कारागीर हे स्वतंत्र आणि आत्मनिर्भर भारताच्या खऱ्या भावनेचे प्रतिनिधित्व करतात आणि या योजनेचा फायदा महिला आणि समाजातील दुर्बल घटकांना होईल.

3. पंतप्रधान विश्वकर्मा योजना कधी सुरू होणार?

सप्टेंबरमध्ये विश्वकर्मा योजना सुरू करण्यात येणार असल्याचे पीएम मोदींच्या वतीने सांगण्यात आले . 17 सप्टेंबर 2023 रोजी विश्वकर्मा जयंती. कारागीर आणि लहान व्यवसायांशी संबंधित लोकांना या योजनेचा लाभ मिळेल, असे पंतप्रधान म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com