Dhan-Dhanya Krishi Yojana:पीएम धन-धान्य कृषी योजना आहे तरी काय? १.७कोटींहून अधिक शेतकऱ्यांना होणार लाभ

Budget PM Dhan-Dhanya Krishi Yojana: केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी पेटी उघडलीय. शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आलीय.
Budget PM Dhan-Dhanya Krishi Yojana
Budget PM Dhan-Dhanya Krishi YojanaStateman
Published On

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या असून आज अर्थमंत्र्यांनी देशातील १.७ कोटी शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिलीय. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना जाहीर केली आहे. या योजनेत १०० जिल्ह्यांचा सहभाग असणार आहे. जेथे कृषी उत्पादन कमी होते, तेथे ही योजना लागू केली जाईल. या योजनेचा फायदा हा थेट १.७ कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. नेमकी ही योजना काय आहे, त्याचा फायदा बळीराजाला कसा होणार हे जाणून घेऊ.

Budget PM Dhan-Dhanya Krishi Yojana
Budget 2025: २ घरांचे मालक आहात, टॅक्सचं टेन्शन घेऊ नका!; बजेटमध्ये तुमच्या फायद्याची घोषणा

काय आहे पीएम धन कृषी योजना

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट २०२५-२६मध्ये कृषी क्षेत्रसाठी विषेश योजनंची घोषणा केलीय. पंतप्रधान किसान योजनेनंतर आता देशात पीएम धन-धान्य कृषी योजनेची सुरुवात केलीय. या योजनेत साधारण १.७ कोटी शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे. पीएम धन-धान्य कृषी योजनेचा उद्देश ग्रामीण भारतात समृद्धी आणणं, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत करणे आणि कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढवणे असा आहे.

Budget PM Dhan-Dhanya Krishi Yojana
Agriculture Minister: कर्जमाफ होईल म्हणून शेतकरी कर्ज भरत नाहीत; कर्ज बुडवणाऱ्यांचे कृषीमंत्र्यांनी टोचले कान

१०० जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार योजना

या योजनेत त्या १०० जिल्ह्यांचा समावेश असेल, ज्या जिल्ह्यांमध्ये शेतीतं उत्पन्न कमी होतं, तेथे ही योजना राबवली जाईल. या अंतर्गत शेतकऱ्यांना उत्पन्नवाढी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी दिल्या जातील. याशिवाय शेतकऱ्यांसाठी इतरही अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यापैकी किसान क्रेडिट कार्डची व्याप्ती वाढवण्यात आलीय. त्यानंतर क्रेडिट मर्यादा ३ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्यात येणार आहे.

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी उच्च दर्जाचे बियाणे दिले जाणार आहे. तसेच शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी खताचा पुरवठा केला जाणार आहे. छोट्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पंप संच यांसारख्या कृषी उपकरणांसाठीही अनुदान दिले जातील. नवीन तंत्रज्ञान आणि कृषी उपकरणांचे प्रशिक्षण दिले जाईल. शेतकऱ्यांना त्यांची शेती सुधारण्यासाठी ज्या काही गोष्टींची कमतरता आहे ती पुरविली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com