Hindenburg Reaserch : सेबी प्रमुखांच्या अडचणी वाढवणारा हिंडनबर्ग अहवाल कसा तयार झाला? संस्थापक कोण? वाचा एका क्लिकवर

Hindenburg Reaserch Who Is Founder Nathan Anderson: गेल्या काही दिवसांपासून हिंडनबर्ग रिसर्च खूप चर्चेत आलाय. आज आपण हिंडेनबर्गचे संस्थापक कोण आहेत, याबद्दल सविस्तर जाणून घेवू या.
हिंडनबर्ग अहवाल
Hindenburg ReaserchSaam Tv
Published On

मुंबई : हिंडनबर्ग अहवालाने भारतीय अब्जाधीश गौतम अदानी (gautam adani) यांच्याबद्दल केलेलं भाकीत खरं ठरलं होतं, तेव्हापासून मागील काही दिवसांपासून हिंडनबर्ग अहवाल चर्चेत आहे. चर्चेत असलेल्या हिंडेनबर्गचे संस्थापक नॅथन अँडरसन आहेत. त्यांनी कनेक्टिकट विद्यापीठातून पदवीचं शिक्षण घेतलंय. २०१७ मध्ये नोकरी सोडून त्यांनी हिंडनगबर्ग या शॉर्ट सेलर फर्मची स्थापना केलीय.

सेबी प्रमुखांवर गंभीर आरोप

हिंडनबर्गने गौतम अदानी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर चर्चेत असलेल्या अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर पडले होते. त्यानंतर आता पुन्हा हिंडनबर्ग चर्चेत आलाय. परंतु यावेळेस भारतातील बाजार नियामक सेबीला हिंडनबर्गने लक्ष्य केल्याचं समोर आलंय. सेबी प्रमुख माधबी पुरी बुच (Sebi chief madhabi buch) आणि त्यांच्या पतीवर अदानी समूहाशी असलेल्या संबंधांचा हवाला देत हिंडनबर्गने गंभीर आरोप केले. या आरोपांवर स्पष्टीकरण देत सेबी अध्यक्षांनी आज एक निवेदन जारी करून आरोप फेटाळलेत. या आरोपांमध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही, असं बुच यांनी म्हटलंय.

हिंडनबर्ग रिसर्चचे संस्थापक

हिंडनबर्ग अहवाल कसा तयार झाला? ही शॉर्ट सेलर फर्म कशी सुरू झाली, याबाबत आपण सविस्तर पाहू या. हिंडेनबर्गचे संस्थापक नॅथन अँडरसन आहेत. अमेरिकेतील कनेक्टिकट विद्यापीठातून इंटरनॅशनल बिझनेसमध्ये पदवी घेतल्यानंतर नॅथनने नोकरी शोधण्यास सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी एका डेटा रिसर्च कंपनीत काम करायला सुरुवात (What is Hindenburg Reaserch) केली. पैशाच्या गुंतवणुकीशी संबंधित संशोधन केलं. काम करत असताना त्यांनी डेटा आणि शेअर मार्केटमध्ये कशी गुंतवणूक करतात, हे जाणून घेतलं होतं.

हिंडनबर्ग अहवाल
Hindenburg Research : भारतात काहीतरी मोठं होणार! अदानींनंतर कुणाचा नंबर? हिंडेनबर्गचा इशारा

हिंडनबर्ग अहवाल कसा तयार झाला?

डेटा रिसर्च कंपनीत काम करत असताना नॅथन अँडरसन (Hindenburg Founder Nathan Anderson) यांना शेअर बाजारात बऱ्याच गोष्टी घडतात, परंतु त्या सामान्य लोकांना सहज समजत नसल्याचं समजलं. येथूनच स्वत:ची संशोधन कंपनी सुरू करण्याचा आणि कंपन्यांचा खुलासा करून त्यामध्ये शॉर्ट चेंज करण्याचा विचार नॅथन अँडरसनच्या मनात आला. त्यानंतर नॅथन अँडरसन यांनी नोकरी सोडली. २०१७ मध्ये हिंडनबर्ग नावाची स्वतःची कंपनी सुरू केली. विशेष म्हणजे त्यांनी कंपनीचं नाव ६ मे १९३७ रोजी न्यू जर्सीच्या मँचेस्टर टाउनशिपमध्ये झालेल्या हिंडेनबर्ग एअरशिपच्या अपघातावरून ठेवलं.

हिंडनबर्ग अहवाल
Hindenburg Research: बदनाम करण्याचा डाव; हिंडेनबर्ग अहवालानंतर सेबी प्रमुख काय म्हणाले? वाचा सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com