मुंबई : हिंडनबर्गच्या नव्या अहवालाने पुन्हा खळबळ उडाली आहे. अदानीनंतर आता हिंडेनबर्गने सेबीच्या प्रमुखांवर आरोप केले आहेत. हिंडनबर्गने शेअर बाजार नियामक संस्था सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांच्यावर आरोप केलेत. माधवी पुरी बुच आणि धवल बुच यांनी शनिवारी १० ऑगस्ट रोजी रात्री उशिरा आलेल्या वृत्तांचं खंडन केलंय. त्यांना 'निराधार' आणि बदनाम करण्याचा डाव आहे, असा आरोप सेबी प्रमुखांनी केलाय.
'बदनाम करण्याचा डाव'
अदानी मनी सिफनिंग स्कँडलमध्ये वापरण्यात आलेल्या ऑफशोर फंडमध्ये सेबीच्या चेअरपर्सन माधवी बुच आणि त्याच्या पतीने स्टेक ठेवल्याचा आरोप हिंडेनबर्गने केलाय. सेबी प्रमुख माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच म्हणाले की, त्यांना कोणतीही आर्थिक कागदपत्रे दाखवण्यात कोणताही संकोच वाटत नाही. सेबीच्या कारणे दाखवा नोटीस आणि कारवाईला प्रत्युत्तर म्हणून हिंडेनबर्गने हा 'बदनाम करण्याचा डाव' (SEBI Chairperson Madhabi Puri buch) रचलाय. १० ऑगस्ट २०२४ च्या हिंडनबर्ग (Hindenburg) अहवालात आमच्यावर करण्यात आलेल्या निराधार आरोपांचे खंडन करतो. यामध्ये कोणतेही तथ्य नाही. सर्व आर्थिक कागदपत्रे दाखवण्यात आम्हाला कोणताही संकोच नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.
यावेळी हिंडेनबर्गने कोणते आरोप केले?
हिंडेनबर्ग रिसर्चने १० ऑगस्ट रोजी आपल्या नवीन अहवालात सेबीच्या चेअरपर्सन माधबी पुरी बुच यांचा अदानीच्या 'मनी सिफनिंग स्कँडल'मध्ये वापरल्या गेलेल्या ऑफशोअर फंडांमध्ये हिस्सा होता, असा आरोप (Share Market) केलाय. सेबी जानेवारी २०२३ मध्ये प्रकाशित झालेल्या हिंडनबर्ग अहवालावर कारवाई करण्यास तयार नाही. कारण सेबीच्या चेअरपर्सन माधबी पुरी बुच यांनी अदानी समूहाशी संबंध असलेल्या ऑफशोअर फंडांमध्ये गुंतवणूक केली होती.
भांडवल बाजारात मोठी खळबळ
अदानी समूह आणि त्याचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी हिंडेनबर्ग रिसर्चने जानेवारी २०२३ च्या अहवालात केलेले सर्व आरोप फेटाळले (Hindenburg Research) आहेत. भांडवली बाजार नियामक सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती यांनी हिंडेनबर्गने त्यांच्यावर लावलेले आरोप निराधार असल्याचं म्हटलंय आहे. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर भांडवल बाजारात मोठी खळबळ उडाली होती.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.